खड्डा चुकवण्याच्या नादात एका कामगाराचा बळी गेल्याची घटना नाशिक येथील सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर परिसरात घडली. राजकुमार सिंग (41), असे या व्यक्तिचे नाव होते.
नाशिक येथील श्रमिक नगर येथे राहणारे राजकुमार सिंह सोमवारी (दि.28) सकाळी कामावर जाण्यासाठी घरून सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 15 सीपी 2708) जात होते. त्यावेळी सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर परिसरातून जात असताना रस्त्यावरील खड्डा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी रस्त्यावरील खडीवरून घसरली. नेमके त्याचवेळी मागून येणाऱ्या आयशरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – State Government : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना)
नाशिक येथे अंबड लिंकरोडवर गॅस पाइपलाइनसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित बुजवले न गेल्याने पूर्वीच्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकी आदळणे,पडणे, वाहनांना धक्के लागणे अशा घटना घडत आहेत. खड्ड्यांमधून कशीबशी वाट काढत करावा लागणारा प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community