विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी येत्या वर्षभरात आणखी पाच ठिकाणी वसतिगृहाची सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम येथील वसतिगृहामुळे नोकरदार महिलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची सुविधा होतानाच महिला सक्षमीकरणासाठीही या वसतिगृहाचा आधार मिळणार आहे. महिलांसाठी या वसतिगृहात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. (Working and Business Women)
मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठीच्या पहिल्या वसतिगृहाचे लोकार्पण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ८ मार्च २०२४ गोरेगाव येथे पालकमंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. एकूण १८० महिलांच्या निवाऱ्याची सुविधा गोरेगाव मधील या वसतिगृहामुळे होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी स्थानिक आमदार विद्या ठाकूर, उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त (पी दक्षिण) संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. (Working and Business Women)
(हेही वाचा – GST Receipt Fraud : बनावट जीएसटी पावत्यांद्वारे २५.७३ कोटींची फसवणूक प्रकरणी एकाला अटक)
पालकमंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले की, महिलांच्या विकासाच्या अनुषंगाने अतिशय चांगली सुविधा या वसतिगृहाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दर्जेदार स्वरूपाच्या इमारतीसोबतच महिलांच्या आरोग्य आणि मनोरंजनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्यासाठी अतिशय वैविध्यपूर्ण अशी वास्तू साकारण्यात आली आहे. मुंबईत याच धर्तीवर आणखी वसतिगृहांचा विकास येत्या वर्षभरात करण्याचे धोरण शासनाने ठेवले आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी नमूद केले. (Working and Business Women)
गोरेगाव स्थानकापासून पश्चिमेला अतिशय जवळच्या नजीकच्या अंतरावर असे हे महिला वसतिगृह महानगरपालिकेच्या भूखंडावर निर्माण करण्यात आले आहे. मोठे आव्हान स्वीकारत वास्तुविशारद आणि इमारत बांधकाम विभागाने सर्व सुविधांनी सज्ज असे १६ मजली असे हे वसतिगृह नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्या १८० महिलांसाठी आधार ठरणार असल्याचे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले, या वसतिगृहाच्या उभारणीसाठी अनेकांचा मदतीचा हात मिळाला आहे. परिवर्तन विकास संस्थेच्या माध्यमातून या वसतिगृहात देखभाल आणि इतर सुविधा पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती प्राची जांभेकर यांनी दिली. (Working and Business Women)
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांना युती करायचीच नव्हती; कारण शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली; एकनाथ शिंदे गटाचा पलटवार)
महिलांसाठी एकत्र मिळून राहण्यासोबतच डॉर्मिटरीची सुविधा
या इमारतीमध्ये महिलांसाठी एकत्र मिळून राहण्यासोबतच डॉर्मिटरीची सुविधा आहे. त्यासोबतच पहिले तीन मजले हे मनोरंजन तसेच विरंगुळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इमारतीमध्ये उपाहारगृहाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तसेच स्वतः जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाकगृहाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
मुंबईच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढवणार
विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेत महिलांची पोकळी भरून काढण्यासाठी धोरणनिश्चिती करतानाच प्रमुख विषय निवडण्यात आले. जेंडर विषयाच्या सल्लागार समितीने नोकरदार, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विविध सुविधायुक्त वसतिगृहे, आधार केंद्र, कौशल्य विकास केंद्र, निवारे आदी सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे नमूद केले होते. त्यानुसारच नोकदार, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी या पहिल्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे. सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील वसतिगृहाची सुविधा यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. (Working and Business Women)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community