नोकरी करणा-या महिलांना लग्नासाठी पसंती नाही, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

80

नोकरी (Working Women) करणा-या महिलांना मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवर मॅच (Life Partner) किंवा जोडीदार सापडण्याची शक्यता कमी असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. तर उलटपक्षी काम न करणा-या स्त्रियांना किंवा नोकरी न करणा-या स्त्रियांना 15 ते 22 टक्के अधिक पसंती असल्याचेही दिसून आले आहे. एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काम करणा-या महिलांच्या तुलनेत लग्नासाठी 75-85 टक्के पुरुष हे कधीही काम किंवा नोकरी न केलेल्या स्त्रियांना अधिक पसंती देतात, असेही समोर आले आहे. डाॅक्टरल कॅन्डिडेड असणा-या दिवा धर यांनी हे सर्वेक्षण केले आहे. दिवा धर हे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ब्लावात्निक स्कूल ऑफ गव्हर्नमेन्टमध्ये डाॅक्टरल कॅन्डिडेड आहेत.

( हेही वाचा: “सरकार पाडण्याचा कट वर्षभरापूर्वीच” )

सर्वेक्षणातील महत्वाच्या नोंदी

  • लग्नानंतर काम सुरु ठेवू इच्छिणा-या महिलांचा पगार हा फार महत्त्वाची भूमिका बजावतो. जास्त पगार घेणा-या महिलांना पुरुषांची पसंती मिळण्याचे प्रमाण अधिक आहे. काही काम न करणा-या किंवा नोकरी न करणा-या महिलांच्या तुलनेत जास्त कमावणा-या महिलांना पसंती देण्याची शक्यता 10 टक्के कमी आहे. तर पुरुषांपेक्षा कमी कमावणा-या महिलांना जास्त पसंती मिळण्याची शक्यता 15 टक्के आहे.
  • 99 टक्के महिला या वयाच्या 40 व्या वयापर्यंत लग्न करतात. आपले काम हे जर लग्नात बाधा ठरणार असेल, तर महिला ते सोडण्याला पसंती देतात, असेही समोर आले आहे.
  • नोकरी न करणा-या किंवा काम करुन पैसे न कमावणा-या महिलांना पुरुषांची अधिक पंसती आहे. काम करणा-या महिलांना मॅट्रोमोनिअर वेबसाइटवर मिळणारा प्रतिसाद हा फारसा चांगला नाही, असेही समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.