उंबरगामच्या आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जयेश मेस्त्रींची “अभिनयाची शाळा” संपन्न!

81
उंबरगामच्या आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जयेश मेस्त्रींची "अभिनयाची शाळा" संपन्न!

शनिवार दिनांक २८ आणि रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी उंबरगामच्या जिल्हापरिषद शाळा, लिलकपाडा आणि वेवजी, नानापाडा येथील आदिवासी पाड्यातील मुलांसाठी बाराखडी ज्ञानकेंद्रातर्फे अभिनयाची शाळा आयोजित करण्यात आली होती. मुख्य प्रशिक्षक जयेश मेस्त्री आणि सहाय्यक मार्गदर्शक रेशमा मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली.

लिलकपाडा, नानापाडा येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून वारली ही मुख्य जमात आढळली जाते. या परिसरातील वारली कला अत्यंत प्रसिद्ध आहे. मात्र काही गाव आजही मागास असून तेथील लोकांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे हा दिव्य विचार समोर ठेवून नाट्य लेखक, दिग्दर्शक व प्रशिक्षक जयेश मेस्त्री, रेशमा मेस्त्री आणि बाराखडी ज्ञानकेंद्राचे शैलेश पाटील यांनी एकत्र येऊन ही अनोखा “अभिनयाची शाळा” आयोजित केली. या कार्यशाळेला मुलांचा उदंड प्रतिसाद लाभला.

lilakpada 1

(हेही वाचा – Pankaja Munde यांनीही धनंजय मुंडे यांना अंतर दिले?)

सुरुवातील मुलं थोडीशी लाजत असली आणि भाषेचं अंतर असलं तरी जयेश मेस्त्री व रेशमा मेस्त्री यांनी मुलांना आपलसं केलं आणि त्यांच्यासोबत हसत खेळत त्यांना अभिनयाचे गुण शिकवले. शब्द कसे उच्चारायचे, संवाद कसा म्हणायचा, सेट कसा लावायचा, रंगमंचावर वावरायचं कसं इत्यादी बाबी त्यांनी मुलांना खेळाच्या माध्यमातून शिकवलं. या प्रसंगी दोन्ही प्रशिक्षकांचा पत्र, मुलांनी बनवलेलं पुष्पगुच्छ आणि अंजली खेमला या विद्यार्थीनीने बनवलेले वारली चित्र देऊन सत्कार करण्यात आला. जयेश मेस्त्री आणि रेशमा मेस्त्री विविध ठिकाणी गरीब मुलांसाठी मोफत नाट्य प्रशिक्षण प्रदान करत असतात.

जिल्हापरिषद शाळा, लिलकपाडा येथील मुख्य शिक्षक ज्ञानेश्वर सरक असून ते मुलांची संख्या वाढवण्याचा आणि मुलांना नव्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अतिशय प्रतिगामी वातारणात ते शाळा प्रयोगशील पद्धतीने चालवत आहेत. तसेच वेवजी, नानापाडा येथील शिक्षक व वारली कलाकार विनेश धोडी हे आदिवासी पाड्यातील मुलांना एकत्र करुन विविध उपक्रम राबवतात. तसेच मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सक्षम करत आहेत. बाराखडीचे शैलेश पाटील हे मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा, आदिवासी पाड्यातील मुलांना मूळ प्रवाहात आणण्याचा आणि एकंदर वाचन संस्कृतीला प्राधान्य देण्याचा उपक्रम राबवत असतात.

Lilakpada 2

(हेही वाचा – Arunachal Pradesh मध्ये जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी लागू होणार धर्मस्वातंत्र्य कायदा)

“जयेश मेस्त्री आणि रेशमा मेस्त्री यांनी मुंबईतून इतक्या दूर येऊन कोणतेही शुल्क न आकारता आदिवासी पाड्यातील मुलांना नाट्य प्रशिक्षण दिलं याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आमची मुलं आणखी पुढे जातील असा मला विश्वास आहे,” असं वक्तव्य शिक्षक ज्ञानेश्वर सरक यांनी केले. तसेच आपले मत व्यक्त करताना शिक्षक विनेश धोडी म्हणाले की, “दोन्ही प्रशिक्षकांनी मुलांना अगदी कमी वेळात बरंच काही शिकवलं आहे. प्रशिक्षणादरम्यान मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रशिक्षक मुलांना सहज आपलसं करतात, हे विशेष आहे. मी त्यांचा ऋणी आहे.” शैलेश पाटील म्हणाले, “जयेशजी आणि रेशमाजी आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात. यापुढेही आम्ही या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यशाळा आयोजित करण्याची योजना आखत आहोत.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.