Ganpati Europe workshop: युरोपमध्ये भरल्या पेणमधील गणेशमुर्तींच्या कार्यशाळा

युरोप खंडातील प्रत्येक शहरात अनेक नामवंत संग्रहालय आहेत. या सर्व संग्रहालयात आशिया खंडातील एक स्वतंत्र दालन असते.

145
Ganpati Europe workshop: युरोपमध्ये भरल्या पेणमधील गणेशमुर्त्यांच्या कार्यशाळा
Ganpati Europe workshop: युरोपमध्ये भरल्या पेणमधील गणेशमुर्त्यांच्या कार्यशाळा

बाप्पाचे माहेरघर अर्थात पेणमधून आतापर्यंत जवळपास २० लाख गणेशमूर्ती देशभरात पोहचल्या आहेत. तसेच इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आदी देशांत १२ हजार मूर्ती रवाना झाल्या आहेत. पेण हे गणपतींच्या मुर्त्यांसाठी हे प्रसिद्ध आहे.पेणची ख्याती पाहता स्वित्झर्लंडमधील झुरीच या शहरातील रीट बर्ग या प्रसिद्ध संग्रहालयाचे जर्मन व्यवस्थापक योहानांन्स बेस्टज यांच्या निमंत्रणावरून पेणचे ख्यातनाम मूर्तिकार व व्यावसायिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांना मूर्ती कलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निमंत्रित केले होते त्यांनी गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा  (Ganpati Europe workshop)घेतली.

बाप्पाच्या डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येथील मूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात मागणी वाढत आहे. युरोप खंडातील प्रत्येक शहरात अनेक नामवंत संग्रहालय आहेत. या सर्व संग्रहालयात आशिया खंडातील एक स्वतंत्र दालन असते. अशा या संग्रहालयातर्फे गणेशोत्सवाचेही आयोजन केले जाते. देवधर यांनी रिट बर्ग संग्रहालयात दहा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेतली.

(हेही वाचा : TOLL EXEMPTION : गणेशोत्सव टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे झाले कट)

सर्वप्रथम त्यांनी मातीच्या गणेशमूर्ती तयार करून दाखवल्या. त्यानंतर या मुलांना छोटे साचे देऊन मूर्ती तयार करून घेतल्या. मूर्तीची कलाकुसर दागिने व मूर्ती रंगवण्याचे प्रशिक्षणही त्यांनी तेथील मुलांना दिले. या कार्यशाळेत झुरीच शहरातील मुलांनी २५ ते ३० गणेशमूर्ती तयार केल्या. त्यापैकी एका गणेशमूर्तीची भारतीय परंपरेनुसार पूजा करून स्थापनाही करण्यात आली. पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून देवधर यांच्या हस्ते विसर्जन सोहळा भारतीय पद्धतीनुसार केला. युरोप खंडात भारतीय विविध सणाबद्दल अत्यंत कुतूहल आणि कौतुक आहे. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.