एड्स सारखा प्राणघातक आजार नियंत्रणात आणण्यास वैद्यकीय क्षेत्राला यश येत असले, तरीही सध्याच्या तरुणाईला वेड लावणाऱ्या टॅटूमुळेही एड्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॅटू त्वचेवर काढताना वापरल्या जाणाऱ्या सुया माणसागणिक वेगवेगळ्या वापरल्या गेल्या नाहीत, तर एड्सबाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला एड्स होण्याचा धोका संभवतो.
त्वचा रोगतज्ज्ञांची माहिती
एड्स झाल्याचे सर्वात ठळक लक्षण म्हणजे शरीरावर चट्टे उमटणे. शरीरावर चट्टे उमटल्यानंतर रुग्ण त्वचासंबंधित आजार समजून त्वचा रोगतज्ज्ञाकडे उपचारांसाठी जातो. तपासणीअंती एड्सचे निदान झाल्यानंतर त्वचा रोगततज्ज्ञ तसेच जनरल फिजिशीयन या दोघांकडेही उपचार घेतो. पण अलिकडे सततच्या जनजागृतीमुळे आता एड्स भारतात नियंत्रणात आला आहे. एड्सबाधित मृत्यूचेही प्रमाण आता बऱ्याच अंशी घटले असल्याची माहिती त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खारकर देतात.
(हेही वाचाः बिबट्यांना आकर्षित करतोय कृत्रिम प्रकाश)
सुरक्षित शारीरिक संबंधांकडे तरुणाईचा कल
गेल्या 35 वर्षांपासून डॉ. खारकर एड्सग्रस्तांवर उपचार करत आहेत. जनजागृतीमुळे सुरक्षित शारीरिक संबंधांकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे एकाहून अधिक व्यक्तीसोबत शारीरिक संबंध राहिल्यास एड्सची भीती टाळण्यासाठी कंडोम वापरणे ही जागरुकता आता वाढली असल्याचे डॉ. खारकर सांगतात.
टॅटू काढताना काळजी घ्या
मात्र, तरुणाईत वाढत चाललेली टॅटूची क्रेझ, टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणा-या सुया माणसागणिक न बदलल्यास एकाच्या शरीरातील रक्त दुसऱ्याच्या शरीरात संक्रमित होते. एखादा रुग्ण एड्सबाधित असल्यास त्याच्या शरीरावर वापरलेली सुई इतरांना वापरल्यास एड्सचा प्रसार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community