World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार

पोलिसांनी कॅब आणि ऑनलाईन तिकीट विक्री पोर्टलच्या अधिकाऱ्यांना नोटीस धाडून हजर राहण्याचे आदेश दिले होते

166
World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार
World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार

कोलकात्यात क्रिकेट वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) तिकिटांचा काळाबाजार खुलेआम होत असल्याची तक्रार एका तक्रारकर्त्याने कोलकाता पोलिसांकडे केली आहे. बंगाल क्रिकेट क्लब (कॅब) (Bengal Cricket Club) आणि बुकिंग अॅप मिळून हा तिकिटांचा काळाबाजार होत आहे, असे या तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.

तिकिटांच्या काळाबाजाराबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कॅब आणि ऑनलाईन तिकीट विक्री पोर्टलच्या अधिकाऱ्यांना नोटीस धाडून हजर राहण्याचे आदेश दिले होते; पण कुणीही प्रतिनिधी आला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. परवा बुधवारी याबाबत मैदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत कॅब अधिकारी आणि ऑनलाईन पोर्टल मिळून काळाबाजार करत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, कॅब आणि पोर्टलने सामान्य क्रिकेटप्रेमींच्या नावाखाली मोठ्या संख्येने तिकीट राखीव केल्या आहेत. हीच तिकिटे ते दोघे मिळून काढत असून ती काळाबाजारात पाठवत आहेत. तक्रारदाराच्या या आरोपांचे कॅबने खंडन केले आहे. आम्ही फक्त सामन्यांचे यजमान आहोत आणि तिकीट विक्रीशी आमचा काडीचाही संबंध नाही. तिकीट विक्रीची सर्व जबाबदारी बुकिंग ऍप आणि आयसीसीची माहिती दिली आहे.

(हेही वाचा – World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार)

ऑनलाईन तिकिटांची काळ्या बाजारात विक्री

भारतातील सर्वसामान्य नागरिकांकडून ऑनलाईन तिकिटाबाबत प्रचंड मागणी होत असूनही त्यांना ऑनलाईनवर अल्प तिकिटे उपलब्ध होतात. तिकीट विक्री सुरू होताच लोकांना तासनतास वाट बघायला लावून प्रचंड तिकीट विक्री होत असल्याचा देखावा निर्माण केला जात असतो. कोणत्याही सामन्याची सामान्य चाहत्यांना अत्यल्प तिकिटे, मात्र आसन क्षमतेच्या 10 ते 20 टक्के तिकिटे कॉम्प्लिमेंटरी म्हणून काळाबाजारात मोठ्या संख्येने कॉम्प्लिमेंटरी म्हणून का वाटण्यात आली? आणि कॉम्प्लिमेंटरी तिकिटे काळाबाजारात उपलब्ध कशी झाली? याबाबत कोणीही तक्रार का करत नाही, असा प्रश्नही या तक्रारदाराने विचारला आहे. सामान्य चाहत्यांना तिकिटे मिळावीत म्हणून ऑनलाईनवर हजारो तिकिटे उपलब्ध केल्याचा आव संघटनांकडून आणला जातो, मात्र प्रत्यक्षात ऑनलाईनची तिकिटे ऍपच्या मार्गे काळ्या बाजारात विकली जातात.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.