World Disabled Day 2023 : दिव्यांग व्यक्तींना सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या योजनेबद्दल सर्वकाही

निवृत्ती वेतन केवळ अपंगांनाच नाही तर विधवा आणि वृद्धांनाही दिले जाते.त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांग व्यक्तींना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट आणि प्राधान्य देण्यात आले आहे.

401
World Disabled Day 2023 : दिव्यांग व्यक्तींना सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या योजनेबद्दल सर्वकाही
World Disabled Day 2023 : दिव्यांग व्यक्तींना सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या योजनेबद्दल सर्वकाही

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोग व्यक्तींच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य विकसित करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना समाजात समान संधी मिळावी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने सरकारद्वारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.केंद्र आणि राज्य सरकारने देशातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना सुरू केल्या आहेत. (World Disabled Day 2023)

केंद्र आणि राज्य सरकारने मिळून दिव्यांगांसाठीही योजना सुरू केल्या. ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची निवृत्तीची काळजी मिटणार आहे. कारण, सरकार दरमहा पेन्शन दिली जात आहे. निवृत्ती वेतन केवळ अपंगांनाच नाही तर विधवा आणि वृद्धांनाही दिले जाते.त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांग व्यक्तींना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट आणि प्राधान्य देण्यात आले आहे. विविध सोयीसुविधा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार योजना राबवत आहे. (World Disabled Day 2023)

(हेही वाचा : Assembly Election 2023 : मतमोजणीला सुरुवात)

अपंगत्व निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय?

केंद्र सरकारने अपंग निवृत्ती वेतन योजना सुरू केली. मात्र यामध्ये राज्य सरकारकडूनही मदत दिली जाते. दरमहा २०० रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम राज्य सरकार देते. राज्य सरकार दरमहा किमान ४०० रुपये आणि कमाल५०० रुपये दरमहा देतात. ही रक्कम राज्यांनुसार बदलू शकते.

योजनेचे उद्दिष्ट
केंद्र आणि राज्य सरकारने देशातील दिव्यांगांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी दिव्यांग पेन्शन योजना सुरू केली. पेन्शनची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये यासाठी ही सुरुवात करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये ही रक्कम दरमहा, त्रैमासिक किंवा सहामाही दिली जाते. दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला कुठेही जाऊन अर्ज करण्याची गरज नाही. यासाठी ऑनलाइन अर्जही करता येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.