पावसाळा लांबणे ही भारतासाठी नवीन गोष्ट नाही, अनेकदा जूनमध्ये सुरू होणारा मान्सून चक्क जुलैच्या शेवटी आलेला आहे, मात्र यामुळे उन्हाळ्याचा कडका वाढतो आणि त्याचे दुष्परिणाम शेतीवर होतातच, परंतु मानवी जीवावरही होतो. अशाच लांबलेल्या पावसाचे दुष्परिणाम भारताने २००३ साली अनुभवला आहे. परिणामी या वर्षी उष्णतेची लाट पसरली आणि तब्बल १४०० जणांचा बळी गेला होता. हे असे वातावरणातील बदल ९ वर्षांनंतरही वाढत आहे, याचा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मागोवा घेणे आवश्यक वाटते.
कोणत्या शहरात किती होते तापमान?
वर्ष २००३ मध्ये देशात सर्वसाधारण तापमानापेक्षा ५ अंशाने तापमान वाढले होते. त्यामुळे त्यावेळी देशातील काही राज्यांतील काही शहरे, जिल्हे काही अंशी बंद पडली होती. त्यावेळी चेन्नईचे तापमान ४५ अंश झाले होते, हा उष्णतेचा उच्चांक मागील ९० वर्षांतील होता. तर नागपूरचे तापमान ४७.७ अंश झाले होते. हा उच्चांक ७० वर्षांतील होता. तर नेहमी थंड वातावरण असणारे आंध्र प्रदेशातील कोठागुडम येथील तापमान तब्बल ५२ अंश झाले होते, तर ओरिसातील तीतलगर आणि बोलांगिर शहराचे तापमान ४९.६ अंश झाले होते. दिल्लीचे तापमान ४५.६ अंश होते. या भागातील नागरिकांनी अक्षरशः स्वतःला घरात कोंडून ठेवले होते. कारण मान्सून १० दिवस लांबला होता, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले होते.
(हेही वाचा शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील मतभेद उघड)
या कारणामुळे वाढलेले तापमान
या उष्णतेचा लाटेत आंध्र प्रदेशातील १२०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ओरिसामध्ये १४३ जणांचा मृत्यू झाला होता. तर पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात राज्यांतील मृत्यू झाले होते. वास्तविक या वर्षी १६ मे पासून मोसमी वारे वाहण्याचे अनुमान होते आणि अंदमान, निकोबार तेथे मान्सून धडकण्याची शक्यता होती, परंतु बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळाने १०-१९ मे दरम्यान मोसमी वाऱ्यांची वाट अडवली, त्यामुळे मान्सून येण्याच्या प्रक्रियेत अडथळा आला.
Join Our WhatsApp Community