भारत हा जगातील सर्वाधीक तरुण पिढी असणारा देश आहे. हीच तरुण पिढी उद्याच्या भारताचे भविष्य आहे. पण ही पिढी योग्य मार्गावर चालतेय का ? याचा विचार करावा लागणार आहे. कारण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतामध्ये 15 वर्षांवरील 20 कोटी मुले धुम्रपानाच्या विळख्यात सापडली आहेत. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने उघड केली आहे. ही संख्या वाढू द्यायची नसेल तर आपल्या देशाच्या या भावी सुजाण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी धुम्रपानविरोधात जनजागृती करण्याची गरज भासत आहे.
धुम्रपानाचे दुष्परिणाम
- एका अहवालानुसार, सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कैकपटींनी असते.
- धुम्रपानकर्त्यांचाच फुफ्फुसाच्या कर्करुग्णांमध्ये समावेश असतो.
- आपल्या नर्व्ह सिस्टीममध्ये धुम्रपान बाधा आणून मेंदूचा शरीरावरील ताबा सुटू शकतो.
- याशिवाय मेंदूवरही याचा परिणाम होतो.
ह्रदयायासाठीही धोकादायक
- धुम्रपान ह्रदयासाठीही धोकादायक असते.
- अतिधुम्रपानामुळे ह्रदय अधिक कमजोर होते
- ह्रदयाकडे जाणा-या रक्तवाहिन्या अरुंद होत जातात. त्यामुळे ह्रदयापर्यंत रक्त पोहोचण्यात बाधा निर्माण होतात.
दात खराब होतात
- दीर्घकाळापर्यंत धुम्रपान केल्यास त्याचे परिणाम दातांवरही दिसू लागतात. दातांच्या कण्यांना सूज येते.
- धुम्रपानामुळे पेरियोडोंटायटिस हा आजार जडतो. या व्याधीत दाढीला संसर्ग होतो.
( हेही वाचा :संजय राऊत यांच्यावर राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी? )
ही खबरदारी घ्या
- धुम्रपानाची सवय हळूहळू कमी करावी.
- व्यसनमुक्ती केंद्राचे मार्गदर्शन घ्यावे.
- कुटुंबाच्या आरोग्यासाठी सतर्क रहावे.