वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने रविवारी सांगितले की, कोरोना व्हायरस संपूर्ण जगभर (किंवा खंडभर) असलेला रोग ज्याप्रकारे विकसित होत आहे, त्यावरून असे दिसून येते की, हा व्हायरस कधीही पूर्णपणे नष्ट होणार नाही. तास या वृत्तसंस्थेने सोलोव्हिएव्ह लाइव्ह यूट्यूब चॅनेलवर रशियामधील डब्ल्यूएचओच्या प्रतिनिधी मेलिता वुजनोविकचा हवाला देत म्हटले आहे की, हा रोग एक स्थानिक रोग म्हणून लोकांमध्ये कायम राहणार आहे. मोलिता पुढे म्हणाल्या की, कोरोना विषाणू स्थानिक आजार बनण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे तो कधीच संपणार नाही. त्यामुळे आपण त्यावर उपचार कसा करावा? आणि या रोगापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? हे शिकले पाहिजे.
…अन्यथा सरप्राईज व्हेरियंट येतील
सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग थांबवणे आणि या संसर्गाला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी करणे. असे केले नाही, तर नवीन स्वरूपातील व्हेरिएंट येतच राहतील, असं मेलिता वुजनोविक यांनी स्पष्ट केलं आहे.
ओमायक्रॉनला कमी लेखू नका
आतापर्यंतचे पुरावे असे सूचित करतात की, ओमायक्राॅन हा प्रकार इतरांपेक्षा कमी गंभीर आहे, परंतु या व्हेरिएंटला कमी लेखू नका. कोरोना व्हायरसबाबत कोणताही हलगर्जीपणा महागात पडू शकतो, असं म्हणत मेलिता वुजनोविक यांनी इशारा दिला.
( हेही वाचा :यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसणार नाही, वाचा कारण )
कोरोना नियमांचे पालन आवश्यक
मेलिता म्हणाल्या की, लसीकरणाव्यतिरिक्त, मास्क घालणे आणि ते नियमित अंतराने बदलणे, गर्दी टाळणे यासह इतर सुरक्षा उपायांचे पालन करणे, आता अत्यंत महत्वाचे असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community