लहान मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत सरकारच्यावतीने मोफत लसीकरण उपलब्ध आहे. या लसीकरणात आता नवनवे लसीकरण उपलब्ध करत सरकारने पालकांचा आर्थिक हातभारही पुरवला आहे. तरीही बाजारात आता नव्याने उपलब्ध लसीकरणाचाही समावेश करण्याबाबत आरोग्य विभागातील अधिका-यांनी सकारात्मकता दाखवली आहे. या लसींची किंमत जास्त असल्याने नव्याने उपलब्ध लसींबाबत अजूनही सरकारी पातळीवर विचारविनिमय सुरु आहे. मात्र नव्या लसी खासगी दवाखान्यात तसेच रुग्णालयात उपलब्ध आहे. जागतिक लसीकरण दिनानिमित्ताने जाणून घ्या लहान मुलांना कोणत्या लसी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देणे आवश्यक आहे.
(हेही वाचा – ‘… सत्ता गेल्याने पुरोगाम्यांची फालतूगिरी!’, शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीवर घणाघात)
सरकारकडून मोफत मिळणा-या लस
० बीसीजी
० तोंडावाटे दिली जाणारी पोलिसो लस
० हेपेटायटीस बी
० मेंदूज्वर आजारासाठी दिली जाणारी लस
० रोटा व्हायरस लस
० निम्मोकोकल लस
० मम्स मिमल्स रुबेला म्हणजेच गालगुंड, गोवर आणि रुबेलावर
० विविध जीवनसत्त्वांशी निगडीत तसेच डिटी
यासह खासगी रुग्णालयात दिल्या जाणा-या प्रतिबंधात्मक आजारांसाठी लस –
० गर्भपिशवीचा कर्करोगावरील लस
गर्भपिशवीचा कर्करोग होऊ नये म्हणून मुलींना वयाच्या दहाव्या वर्षापासून प्रतीबंधात्मक लस देता येते. यात दोन प्रकार उपलब्ध आहेत.
० कांजण्या
० हेपेटायटीस ए
० थायरॉईड