नुकत्याच जाहीर झालेला जागतिक विषमता अहवाल 2022 नुसार, जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्यात आला आहे. वर्ष 2021 मध्ये भारतातील एक टक्का लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 22 टक्के संपत्ती आहे. जागतिक असमानता या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी फ्रान्सचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी सहकार्य केले आहे.
सरासरी राष्ट्रीय उत्पन्न रु. 2 लाख 4 हजार 200
फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी हा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. भारत हा जगातील सर्वात विषमता असलेल्या देशांपैकी एक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न 2 लाख 4 हजार 200 रुपये आहे.
एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 57 टक्के वाटा
अहवालानुसार, भारताच्या 10 टक्के लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 57 टक्के वाटा आहे. यामध्येही एक टक्के लोकसंख्येकडे २२ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. तसेच, 50 टक्के लोकसंख्येकडे 13 टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. त्यानुसार, भारतातील सरासरी घरगुती मालमत्ता 9 लाख 83 हजार 10 रुपये आहे.
लैंगिक असमानतेचा उल्लेख
भारतात लैंगिक असमानता खूप जास्त असल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतात महिला कामगारांचे उत्पन्न 18 टक्के आहे. आशियातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
( हेही वाचा : जेएनयूत अवतरली ‘बाबर’ची औलाद! म्हणतेय… )
Join Our WhatsApp Community