जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के लोकसंख्या भारत आणि चीनमध्ये

जगाची एकूण लोकसंख्या मंगळवारी 15 नोव्हेंबरला 800 कोटींवर पोहोचली आहे. हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे, मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अॅंटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 35 टक्के लोकसंख्या भारत आणि चीनमध्ये आहे. भारताची लोकसंख्या 135 कोटी तर चिनची लोकसंख्या 141 कोटी आहे. जगात 800 कोटीवे मूल जन्माला आले आणि पुन्हा एकदा जगातील वाढती लोकसंख्या चिंतेचे कारण असल्याचे समोर आले.

बाळाचा जन्म कुठे झाला?

जगातील 800 कोटीच्या मुलाचा जन्म कुठे झाला, याबाबत अनेकजण गूगलवर सर्च करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले की, या मुलाचा जन्म सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन किंवा भारतात झाला नाही. या चिमुकलीचा जन्म फिलीपिन्सची राजधानी मनिला इथे झाला आहे. मंगळवारी सकाळी मनिलामध्ये एका मुलीचा जन्म झाला असून ती जगातील 800 कोटी नंबरची मुलगी असल्याचा दावा केला जात आहे.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणार हिंदुत्वाचा वारसा कार्यक्रम )

48 वर्षांत जगाची लोकसंख्या दुप्पट

जगाची लोकसंख्या 8 अब्ज झाली आहे. यामुळे भविष्यात अन्नधान्यासह इतर गरजांची कमतरता भासू शकते. पण, तज्ज्ञांच्या मते या शतकात एक वेळ अशी येईल, जेव्हा लोकसंख्या वाढ स्थिर होईल आणि नंतर घटदेखील दिसून येईल. मात्र, गेल्या 48 वर्षांत वाढलेली लोकसंख्या धक्कादायक आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 4 अब्ज होती. ती आता 8 अब्जच्या पुढे गेली आहे. 1950 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त अडीच अब्ज होती. एवढेच नाही तर 2086 हे असे वर्ष असेल, जेव्हा या जगातील मानवांची लोकसंख्या 10.6 अब्जांच्या पुढे जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here