World Sparrow Day : चिमण्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक

224
World Sparrow Day : चिमण्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मानव जेव्हापासून वस्ती करून राहू लागला तेव्हापासून त्यांच्या आजूबाजूला चिमणीचा अधिवास आहे. त्यामुळे चिमण्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा ‘इंडियन स्पॅरोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे व नेचर फॉरएव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी व्यक्त केली. (World Sparrow Day)

जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका व नेचर फॉरएव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन इमारत सभागृहात गुरुवारी २० मार्च २०२५ रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मोहम्मद दिलावर बोलत होते. (World Sparrow Day)

New Project 2025 03 20T184833.876

(हेही वाचा – कराड शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी होणार; मंत्री Chandrakant Patil यांची विधानसभेत माहिती)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, मार्गदर्शक सुजीत पाटील आदींसह पर्यावरणाचे अभ्यासक यावेळी उपस्थित होते. (World Sparrow Day)

दिलावर यांनी ‘स्पॅरो कॉन्झर्व्हेशन अलायन्स’ उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय आणि खासगी संस्थांच्या सहकार्याने आर्थिक मदत मिळवून चिमण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. या वेळी ‘आय लव्ह स्पॅरो’ या मोहिमेचीही माहिती देण्यात आली. चिमण्यांच्या संवर्धनासाठी मोफत घरटे व अन्न सेवा सुविधा पुरवण्याबाबतही चर्चा झाली. चिमण्यांच्या संवर्धनासाठी घराबाहेर पाण्याचा घडा ठेवा, नेस्ट बॉक्स आणि फीड बॉक्स बसवा, पार्किंग लॉट आणि सोसायटीमध्ये नेस्ट बॉक्स ठेवा, असे आवाहनही या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आले. (World Sparrow Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.