जागतिक चिमणी दिनानिमित्त सद्गुरु आश्रमशाळेत घरटे बनविण्याचा उपक्रम

101

निसर्ग साखळीत प्राणी- पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. याची जाणीव शालेय विद्यार्थ्यांना व्हावी तसेच निसर्ग व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने जागतिक चिमणी दिनानिमित्ताने शेरे (ता. कराड) येथील सद्गुरु आश्रमशाळेने घरटी बनवण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक घरटी बनवून त्यांच्या अन्नपाण्याची तजवीज केली.

( हेही वाचा : अंबरनाथमधील भंगारगल्लीत पुन्हा भीषण आग; तीन गोदाम जळून खाक )

शाळेचे उपक्रमशील शिक्षक व पक्षी मित्र आष्पाक आत्तार यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे संभाजी पाटील यांच्या प्रेरणेने घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व समाजासाठी प्रेरणादायी ठरला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर बसून पक्षांसाठी स्वतः घरटी तयार केलीय या घरटयांवर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण, चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये एक पक्षी की जान बचाएं ,पक्षी है खेतों की शान , जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाव, जीवन बचाव असे अनेक शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

आता नेहमीच आम्ही पक्षांसाठी वाटीभर पाणी मूठभर धान्य अंगणात ठेऊन “पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा” असा शुभ संदेश समाजापर्यंत पोहोचू असा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमामुळे पर्यावरणाविषयी जनजागृती होऊन उन्हाळ्यात पक्षांना आपले हक्काचे आणि आकर्षक घर मिळाले आहे. समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल आणि निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण करता येईल, असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.