भारतातील वनस्पती आणि प्राणी याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यभरात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ८ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण (Wildlife Week) कसे करावे, या संकल्पनेवर वन्यजीव कार्यकर्ते (Wildlife Activists) काम आहेत.
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह (National Wildlife Week) भारतभर दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन (Conservation) करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. २०२३ मध्ये ६९वा वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे.
(हेही वाचा – Mumbai High Court : फुटपाथवरील लोखंडी खांबांचा व्हीलचेअरसाठी अडथळा; उच्च न्यायालयात जनहित याचिका)
वन्यजीव सप्ताह (Wildlife Week) सुरुवातीला १९५५ मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर १९५६ मध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला होता. अनेकदा वन्यप्राणी विहिरीत अडकणे, कारला धडकणे, विजेचा धक्का बसणे किंवा झाडात अडकणे अशा कठीण प्रसंगात अडकतात. या परिस्थितींना वन्यजीव बचाव पथकांकडून त्वरित प्रतिसाद आवश्यक आहे. तथापि, त्यांना फक्त जतन करणे पुरेसे नाही. त्यामुळे या वन्यजीवांना संरक्षण मिळण्यासाठी आणि त्यांचे संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची माहिती मानव-वन्यजीव संवादाचे संचालक नचिकेत उत्पात (Director of Human-Wildlife Interaction Nachiket Utpat) यांनी दिली आहे.
माणसांचा प्राण्यांशी सामना होण्याचे प्रमाण वाढत आहे. लोकांनीही पाळीव प्राणी आणि वन्यप्राणी यांच्यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. मानव आणि प्राण्यामध्ये योग्य सुसंवाद राखला जावा, यासाठी या वन्यजीव सप्ताहामार्फत प्रयत्न करण्यात येणाऱ असल्याची माहितीही संचालक उत्पात यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community