मागील गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण जग वेगवेळ्या व्हायरसच्या आजारांना तोंड देत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या विषाणूंनी डोकं वर काढलं आहे. पुन्हा रुग्णालयांमध्ये मास्क सक्ती झाली आहे. अशातच आरोग्य संघटने कडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. H3N8 बर्ड फ्लूमुळे जगातील पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. चीनमधून या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यू झालेली व्यक्ती एक महिला आहे.
या बर्ड फ्लूमुळे आयुष्य संपणारी ती जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे. मात्र H3N8 बर्ड फ्लूचे विषाणू लोकांमध्ये सहसा पसरताना दिसत नाहीत, ही एक दिलासा देणारी बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार, ग्वांगडोंगच्या दक्षिणेकडील प्रांतातील ५६ वर्षीय महिला H3N8 बर्ड फ्लू होणारी तिसरी व्यक्ती होती. या स्ट्रेनचा संसर्ग झालेले तिन्ही रुग्ण चीनमधीलच असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
(हेही वाचा भारताने रशिया-युक्रेनमधील संर्घषात मध्यस्थी करावी; युक्रेनची मागणी)
मृत्यू झालेल्या महिलेला न्यूमोनिया झाला होता. याशिवाय तिला इतरही काही आजार होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. H3N8 चे विषाणू मानवांमध्ये जरी दुर्मिळ असले तरी ते पक्ष्यांमध्ये सामान्य आढळून येतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार हे विषाणू इतर सस्तन प्राण्यांमध्येही आढळून आले आहेत.
Join Our WhatsApp Community