World’s Richest 2024 : जगातील १०० अब्ज क्लबमधून यंदा अदानी, अंबानी बाहेर

World’s Richest 2024 : भारतीय उद्योग क्षेत्रातील परिस्थिती त्यामुळे अधोरेखित झाली आहे.

73
World’s Richest 2024 : जगातील १०० अब्ज क्लबमधून यंदा अदानी, अंबानी बाहेर
  • ऋजुता लुकतुके

एरवी भारत आणि आशियाई श्रीमंतांच्या यादीत मानाने मिरवणाऱ्या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या जोडीला यंदा ब्लूमबर्गच्या १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या क्लबमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. एरवी भारतीय अब्जाधीशांच्या मिळकतीत वाढच झाली आहे. पण, उद्योग क्षेत्रासमोरील आव्हानं पाहता अंबानी आणि अदानी यांना १०० अब्ज अमेरिकन डॉलरची मजल मारता आली नाही, असं ब्लूमबर्गच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. (World’s Richest 2024)

एरवी भारतातील पहिल्या १० उद्योगपतींच्या मिळकतीत २०२४ मध्ये एकूण ६८ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे. शिव नादर यांची मिळकत १०.८ अब्ज अमेरिकन डॉलर तर सावित्री जिंदाल यांची संपत्ती १०.१ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढली आहे. पण, ऊर्जा आणि रिटेल क्षेत्रांना हवं तसं यश न मिळाल्यामुळे रिलायन्स आणि अदानी समुहाची संपत्ती काहीशी कमी झाली आहे. (World’s Richest 2024)

(हेही वाचा – मशिदीत ‘जय श्री राम’ च्या घोषणा देणे गुन्हा कसा ? Supreme Court चा कर्नाटक सरकारला सवाल)

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती यावर्षी जुलै महिन्यात १२० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. पण, त्यानंतर ऊर्जा आणि रिटेल उद्योगात झालेल्या घसरणीचा फटका मुकेश अंबानी यांच्याकडे असलेल्या शेअरना बसला. आणि त्यांची मालमत्ता ९६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी खाली आली आहे. रिलायन्स समुहावर वाढत असलेल्या कर्जाचीही भीती काही गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. (World’s Richest 2024)

तर गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योग समुहावरील संकटं आणखी गंभीर आहेत. समुहाच्या ७ कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. आणि अलीकडेच अमेरिकन न्याय आणि प्रतिभूती विभागाने त्यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे गौतम अदानींसह त्यांच्या समुहातील आणखी ९ संचालकांवर अमेरिकेत खटला सुरू झाला आहे. आणि हे प्रकरण कंपनीला आताही अडचणीत आणत असतानाच पुढेही कंपनीच्या संकटात वाढ होण्याचीच शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जून २०२४ मध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२२ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. ती खाली येऊन ८२.१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे. (World’s Richest 2024)

(हेही वाचा – Noise Pollution: मुंबईत हॉर्नचा सर्वाधिक आवाज ‘या’ भागातून)

ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालात भारतीय उद्योजकांसाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रंप यांची अमेरिकन अध्यक्षपदी झालेली निवड आणि अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या उपग्रह प्रक्षेपण कंपनीच्या भारतातील भावी योजना पाहता, भारतीय दूरसंचार क्षेत्रावर या गोष्टींचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याचा परिणामही रिलायन्स जिओवर होऊ शकतो. (World’s Richest 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.