लडाखमध्ये जगातील सर्वात उंच रस्ता, गिनीज बुकमध्ये नोंद

लडाखमध्ये बांधण्यात आलेला रस्ता जगातील सर्वात उंच रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. लडाखमधील उमलिंगला खिंडीत समुद्रसपाटीपासून १९ हजार २४ फूट उंचीवर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या वतीने लडाखच्या उंच डोंगराळ भागात बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने पाच वेगवेगळ्या सर्वेक्षणकर्त्यांद्वारे या रस्त्याची पडताळणी केली. यासाठी त्यांना चार महिने लागले.

रस्ताबांधणी दरम्यान आलेली आव्हाने

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) च्या कामगिरीबद्दल महासंचालक बॉर्डर रोड्स (DGBR), लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, सोशल मीडियावर अभिनंदनाच्या संदेशांचा पूर आला. अत्यंत खडतर प्रदेशात मानवी आत्मा आणि यंत्रांची कार्यक्षमता या दोन्हींची चाचणी केली जेथे हिवाळ्यात तापमान उणे ४० अंशांपर्यंत खाली जाते आणि ऑक्सिजनची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. असे, मत व्यक्त करताना बीआरओ प्रमुख लेफ्टनंट जनरल चौधरींनी उमलिंगला खिंडीपर्यंत रस्ता बांधणीदरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले.

( हेही वाचा : राज्यात लसीच्या पहिल्या डोसचे ७ कोटींहून अधिक मानकरी )

एव्हरेस्ट बेस कॅम्पपेक्षा जास्त उंची

माउंट एव्हरेस्टच्या उत्तर आणि दक्षिण बेस कॅम्पपेक्षा जास्त उंचीवर हा रस्ता बांधला गेला आहे. उत्तर-दक्षिण बेस कॅम्पची उंची अनुक्रमे १६ हजार ९०० फूट आणि १७ हजार ५९८ फूट एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here