हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणानंतर आणखी एका अपघाताने वरळी (Worli Accident) हादरली आहे. 20 जुलै रोजी वरळीत ठाण्यातील (Thane) व्यावसायिकाच्या गाडीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती. व्यावसायिकाच्या बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी व्यावसायिकाचा चालक गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – Plastic Ban : प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच राहणार का?)
वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफार खान रोडवर 20 जुलै रोजी बीएमब्यल्यूने एका तरुणाला मागून येणाऱ्या मोटरगाडीने धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार विनोद लाड (वय 28) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनोदवर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान विनोद लाड यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी तो ठाण्याहून वरळीमध्ये आला होता. अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण
मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. मोटरसायकलवरून खाली पडून विनोदच्या डोक्याला मार लागला होता. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. त्याची दुचाकी ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर खळबळ माजली होती. अशातच आणखी एका अपघाताने वरळी हादरली आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community