मुंबईत जुलै महिन्याच्या पंधरवड्यात पावसाळी आजारांचे प्रमाण वाढत असताना वरळी आणि प्रभादेवी मलेरियाचे हॉटस्पॉट ठरल्याचे उघडकीस आले आहे. या भागात बांधकामांचे काम जोरात सुरु असल्याने मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ज्या भागात कीटकनाशकांची फवारणी सहजरित्या करणे शक्य नाही अशा भागात ड्रॉनच्या माध्यमातून फवारणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
(हेही वाचा – निधी वाटपातील दुजाभाव हा लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय – अंबादास दानवे)
बांधकाम क्षेत्रात सतत पाण्याचा वापर असतो. इमारतीतील अडगळीच्या ठिकाणी साचलेले पाणी तसेच सिमेंटच्या टाकीत किंवा ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. वरळी आणि प्रभादेवीतील जुन्या बांधकामात अडगळीच्या जागेत पाण्याची डबकी आढळली आहे. पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांना मलेरिया प्रतिबंधात्मक सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही पालिकेने दिला आहे.
मलेरियाची लक्षणे –
- ताप, पोटदुखी, उलट्या, मळमळ, स्नायू दुखणे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community