बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या चाळींमधील भाडेकरूंचे गाळे रिकामे करून घेण्यात सुलभता यावी व यासाठी गाळेधारकांचा प्रतिसाद वाढण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील पात्र गाळेधारकांना सुरुवातीला ११ महिन्यांचे दरमहा भाडे एकत्रित दिल्यानंतर पुढच्या टप्प्यात एक महिन्याऐवजी आता यापुढे एकत्रित ११ महिन्यांचे भाडे देण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे. (Worli BDD Chawl)
या पुनर्विकास प्रकल्पातील तीनही चाळींतील असे निवासी तथा अनिवासी गाळेधारक ज्यांनी म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील गाळ्याचा विकल्प स्वीकारलेला नाही, अशा गाळेधारकांना म्हाडाकडून भाडे देण्यात येते. सुरुवातीला ११ महिन्याचे एकत्रित भाडे दिल्यानंतर प्रत्येक महिन्याचे भाडे देण्याऐवजी पुन्हा एकत्रित ११ महिन्यांचे भाडे देण्यात यावे, अशी मागणी संबंधित गाळेधारकांकडून करण्यात आली. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (Worli BDD Chawl)
या निर्णयानुसार यापुढे बीडीडी चाळ (BDD Chawl) पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकांमध्ये स्थलांतरीत होतील तोपर्यंत तिन्ही चाळींतील पात्र गाळेधारकांना हा निर्णय लागू असणार आहे. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित केल्यानुसार स्वत:ची सोय करून रहात असलेल्या पात्र गाळेधारकांना एकत्रित ११ महिन्यांचे भाडे म्हाडातर्फे देण्यात येणार आहे. तसेच संबंधित कार्यकारी अभियंता कार्यालयाने प्रमाणित केल्यानुसार ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे असेल तर हे भाडे अदा केल्यानंतर वास्तव्याच्या कालावधीमध्ये पुढील एखाद्या महिन्याची वाढ होत असेल तर एक महिन्याचे त्यानुसार भाडे अदा करण्यास मुभा देण्यात येणार आहे. सरसकट एकत्रित ११ महिन्यांचे भाडे न देता त्यांच्या संभाव्य वास्तव्याच्या कालावधीपर्यंतच एकत्रितपणे प्रमाणित करून भाडे अदा करण्यात येणार आहे. (Worli BDD Chawl)
(हेही वाचा – BMC CBSE School : मुंबई महापालिकेच्या आणखी पाच सीबीएसई मंडळाच्या शाळांची ‘एन्ट्री’)
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सद्यस्थितीत वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत चाळीतील पात्र निवासी गाळेधारकांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करून देऊन त्यांना स्थलांतरित करण्यात येते. ‘म्हाडा’कडे सद्यस्थितीला निवासी पात्र लाभार्थ्यांना संक्रमण शिबिरातील गाळे वाटप करण्यासाठी अपुरे आहेत. त्यामुळे भाडेकरूंना भाडे घेण्याचा विकल्प देण्यात आला आहे. संबंधित पात्र निवासी गाळेधारकांना संक्रमण शिबिर आवास नको असेल तर त्यांना त्यांच्या विकल्पानुसार दरमहा पंचवीस हजार रुपये भाडे म्हाडाकडून अदा केले जाते. चाळीतील पात्र अनिवासी गाळेधारकांनाही दरमहा नुकसान भरपाई म्हणून पंचवीस हजार रुपये भाडे म्हाडाकडून अदा केले जाते. हे भाडे अदा करण्यास म्हाडाने सुरुवात केली आहे. (Worli BDD Chawl)
वरळी पुनर्वसन सदनिकांची निश्चिती येत्या आठवड्यात
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्विकसित इमारतीच्या बांधकामाकरिता आवश्यक असलेल्या चाळींमधील पात्र गाळेधारकांना प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये वितरीत करावयाच्या पुनर्वसन सदनिकांची निश्चिती संगणकीय प्रणालीद्वारे येत्या आठवड्यात ‘म्हाडा’तर्फे केली जाणार असल्याचेही म्हाडाच्यावतीने सांगण्यात आले आहे. (Worli BDD Chawl)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community