Worli Hit and Run : मिहीर शाहचा रक्त तपासणी अहवाल आला समोर, चर्चांना उधाण

124
Worli Hit and Run : मिहीर शाहचा रक्त तपासणी अहवाल आला समोर, चर्चांना उधाण
Worli Hit and Run : मिहीर शाहचा रक्त तपासणी अहवाल आला समोर, चर्चांना उधाण

बीएमडब्ल्यू हिट अँड रन (Worli Hit and Run Case) प्रकरणातील मिहीर शाहचा रक्ताचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याने मद्यप्राशन केले नव्हते, असे यात म्हटले आहे. ७ जुलै रोजी झालेल्या या भीषण अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता.

वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता आणि मद्य प्राशन केल्याचे त्याने तोंडी मान्य केले होते. मात्र मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली. रक्ताचा अहवाल आता निगेटिव्ह आल्याने अनेक शंका कुशंकांना वाव मिळाली आहे.

(हेही वाचा – Bangladesh protests: बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क; सीमेवर नेमकं काय घडतयं?)

आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. परंतु, आता आलेल्या अहवालानुसार त्याने मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. जवळपास तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक केली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं. (Worli Hit and Run)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.