निसर्गाचा कोप! Papua New Guinea मध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; २००० हून अधिक लोकांचा मृत्यू

274
निसर्गाचा कोप! Papua New Guinea मध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; २००० हून अधिक लोकांचा मृत्यू

पापुआ न्यू गिनीमध्ये (Papua New Guinea) भूस्खलनामुळे (landslide) २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यापूर्वी ही संख्या ६७० असल्याचे सांगितले जात होते, त्यात सातत्याने वाढ होत आहे. दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पापुआ न्यू गिनीच्या सरकारी आपत्ती केंद्राने सांगितले की, भूस्खलनामुळे २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून सुमारे ६०० किलोमीटर उत्तर-पश्चिमेस असलेल्या एन्गा प्रांतातील एका गावात गेल्या शुक्रवारी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक घरांमध्ये झोपलेले लोक गाडले गेले. पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर केंद्राने संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रात याची माहिती दिली.  (Papua New Guinea)

(हेही वाचा – Veer Savarkar: हिंदुस्थान हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र!)

सोमवारी पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर सेंटरनं यूएनला लिहिलेल्या पत्रामध्ये मृतांची संख्या २००० च्या वर गेल्याचं नमूद केलं आहे. तसेच इमारती, शेती, बागांचे अतोनात नुकसान झाले असून देशाच्या आर्थिक जीवनरेषेवर मोठा परिणाम झाला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती केंद्राच्या एका अधिकाऱ्याने संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. (Papua New Guinea)

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Jayanti Special: अभिनेता रणदीप हुड्डा यांनी दिली सेल्युलर तुरुंगाला भेट, ‘X’वर व्हिडिओद्वारे भावना व्यक्त करताना म्हणाले…)

दरम्यान, दरडीखाली दबलेल्या गावाची लोकसंख्या किती होंती याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू (2000 people died) झाल्याचे समोर आले असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पापुआ न्यू गिनीची शेवटची जनगणना २००० साली पार पडली होती. त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसार या गावाची सांगण्यात आलेली लोकसंख्या नंतरच्या काळात बरीच वाढली असल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, पथकाला बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत असून अजूनही बचाव कार्य सुरु आहे. (Papua New Guinea)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.