पैलवान Shivraj Rakshe कुस्तीगीर परिषदेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार

40

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांची कुस्ती आता न्यायालयात पोहचणार आहे. मला जाणीवपूर्वक पराभूत घोषित केले, असा दावा राक्षे याने केला आहे. त्यामुळे आपण न्यायालयात दाद मागणार आहे, असे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने जाहीर केले आहे. दरम्यान, त्याचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी एक न्यायालयात आव्हान दिले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हीडीओ पाठवून त्यांच्याकडून शिवराज (Shivraj Rakshe) पराभूत झाल्याचे सिद्ध करा, असे आव्हान दिले आहे.

(हेही वाचा Kerala मध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत हिंदूंपेक्षा पाचपटीने वाढ)

नगरच्या वाडियापार्क मैदानावर रविवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लढती झाल्या. गादी विभागातील दोन्ही अंतिम लढती वादग्रस्त ठरल्या. माती विभागात महेंद्र गायकवाड (सोलापूर) व साकेत यादव (परभणी) यांची अंतिम लढत झाली. त्यात महेंद्र गायकवाड विजयी होऊन त्याने महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. दुसरीकडे गादी विभागाची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ (पुणे) व शिवराज राक्षे (नांदेड) (Shivraj Rakshe) यांच्यात झाली. पृथ्वीराजने ढाक डावावर अवघ्या एका मिनिटात राक्षेला चितपट करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. त्यानंतर मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.