महाराष्ट्र पोलीस दलात सध्या सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली असून २ एप्रिलला लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच पाच तृतीयपंथीयांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.
( हेही वाचा : मनसेतून ठाकरे गटात आलेले सर्व माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात)
पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा
मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेरीट यादी पाच-सहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस मुख्यालयाने दिली आहे. दरम्यान गृह विभागाच्या परिपत्रकानुसार पोलीस चालकपदाची लेखी परीक्षा २६ मार्चला होणार असून शिपाई पदाची लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे.
बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहेत.