‘X’ दोन वेळा झाले डाऊन; सायबर हल्ला झाल्याची Elon Musk यांची माहिती

49

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ सोमवार, १० मार्च या दिवशी दोन वेळा डाऊन झाले. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, अशा जगभरातील अनेक देशांत ही समस्या जाणवली. इलोन मस्क (Elon Musk) यांनी एक्सवर सायबर हल्ला झाल्याची स्वीकृती दिली आहे. पॅलेस्टाइन समर्थक कुख्यात हॅकर समूह ‘डार्क स्टॉर्म टीम’ने (Dark Storm Team) ‘टेलीग्राम’वर या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्विस (DDoS)’ अॅटॅक करून ‘X’ चे सर्व्हर डाऊन केल्याचे हॅकर समूहाने म्हटले आहे.

(हेही वाचा – सरकारी परीक्षेत बनावट उमेदवारांचा जामीन अर्ज Supreme Court ने फेटाळला; म्हणाले, गैरप्रकारांमुळे…)

डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (Distributed Denial of Service, DDoS) हा वेबसाइट अथवा सर्व्हर हॅकिंगपेक्षा एक वेगळा सायबर अॅटॅक आहे. यात हॅकर्स वेबसाइट अथवा सर्व्हरवर बनावट ट्रॅफिक पाठवतात. हॅकर्सकडून वेगवेगळ्या कंप्यूटर अथवा बॉटनेटच्या माध्यामाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट ट्रॅफिक पाठवले जाते की, संबंधित साइटच्या सर्व्हरवरील लोड मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि सर्व्हर डाऊन होते.

यासंदर्भात इलॉन मस्क म्हणाले, “‘एक्स’वर सायबर हल्ला झाला आहे. असे हल्ले रोज होत आहेत. मात्र, या वेळचा हल्ला मोठा आहे. हे कृत्य एखाद्या मोठ्या समूहाचे आहे, की यामागे एखाद्या देशाचा हात आहे? या संदर्भात शोध सुरू आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.