सध्या संपूर्ण राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर (Yavatmal Flood) आले आहेत. या पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे (Yavatmal Flood) तब्बल ४५ नागरिक अडकले आहेत. या अडकेलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत यवतमाळमधील पूर (Yavatmal Flood) परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. तर भारतीय हवाई दलाचे २ हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहचणार आहेत. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच प्रशासन यवतमाळ मधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार यांच्या देखील ते संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2023
(हेही वाचा – Raigad : बचावकार्य करतांना पोलीस उपनिरीक्षक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू)
यवतमाळला पुराचा वेढा
यवतमाळच्या वाघाडी नदीला पूर (Yavatmal Flood) येऊन पुराचे पाणी थेट काठावर असलेल्या ५० ते ६० नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे घरातील धान्य, कपडे इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं चित्र आहे. आपला जीव वाचवण्यासाठी कोणी घरांच्या वर चढले तर काहींनी झाडाचा आसरा घेतला. जिल्ह्यातील दारव्हा, नेर, घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड, बाभूळगाव-कळंब मार्ग बंद झाले आहेत. तिवसा कारेगाव यावली, कोटंबा, चाणी कामठवाडा आणि नायगाव या गावांना पुराचा वेढा पडला आहे. तर महागावच्या पैंनगंगा शिरफुली, राहुर गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community