बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना (Yellow Heat Alert) आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Heat Alert) तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण जरी असले तरी मोठ्या प्रमाणात तापमान देखील वाढले आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत 33 °C, तर ठाण्यात 36°C तापमानाची नोंद झाली आहे. (Yellow Heat Alert)
(हेही वाचा –Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल)
वेधशाळेने जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या स्वरूपात गारा पडण्याचा इशारा दिला आहे. (Yellow Heat Alert) त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, मारेगाव, वणी, कळंब, राळेगाव तालुक्यात ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे प्रचंड उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Yellow Heat Alert)
कोणत्या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट? (Yellow Heat Alert)
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ. (Yellow Heat Alert)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community