Yerawada Jail : कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर बायोमेट्रिक, पॅनीक अलार्मसह आधुनिक प्रणालींचा वापर

45
Yerawada Jail : कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर बायोमेट्रिक, पॅनीक अलार्मसह आधुनिक प्रणालींचा वापर

कारागृहातून कैद्याने पलायन करू नये तसेच, या कैद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून आता अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा मध्यवर्ती आणि महिला कारागृहात बायोमेट्रिक, पॅनीक अलार्म आणि सार्वजनिक संबोधन प्रणाली बसविण्यात आली आहे. (Yerawada Jail)

तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षांत ही प्रणाली सुरू करण्यात आली. हरियानातील गुरुग्राम येथील इन्व्हेडर टेक्नॉलॉजीज कंपनीमार्फत ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. (Yerawada Jail)

(हेही वाचा – Arjun Erigaisi : अर्जुन एरिगसीला अमेरिकन व्हिसा मिळवण्यात अडचणी, केंद्र सरकारकडे मागितली मदत)

पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) प्रशांत बुरडे, डॉ. जालिंदर सुपेकर आणि कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. (Yerawada Jail)

याप्रसंगी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, इन्व्हेडर टेक्नॉलॉजीज कंपनीचे शशांक मिश्रा यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ही प्रणाली टप्याटप्याने राज्यातील इतर कारागृहांमध्येही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Yerawada Jail)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.