Yog Din 2024: मोदींनी परिधान केलेल्या ‘गमछा’कडे नेटकरी आकर्षित! काय आहे वैशिष्ट्य?

209
Yog Din 2024: मोदींनी परिधान केलेल्या 'गमछा'कडे नेटकरी आकर्षित! काय आहे वैशिष्ट्य?

आंतरराष्ट्रीय योग दिन नुकताच साजरा करण्यात आला. ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी आहे, त्यांच्यासाठी शुक्रवार (२१ जून) महत्त्वाचा होता. पंतप्रधान मोदींनीही ७००० लोकांसोबत डल लेकच्या किनारी श्रीनगरमध्ये योगा करून योगाचं महत्त्व पटवून दिलं. त्याआधी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. काश्मीरच्या भूमीवरून पीएम मोदींनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. (Yog Din 2024)

मोदींनी योगा केल्याचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियाच्या माध्यामतून जनतेसमोर आले. लोकांनी ते पाहिले. या फोटोकडे सर्व नेटकरी आकर्षित झाले होते, मात्र यावेळी मोदींनी परिधान केलेल्या गमछाकडे सगळ्यांचे लक्ष आकर्षित झाले. गमछाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा गमछा साधारण गमछासारखा नसून तो आसाममधला आहे. तिथल्या कलाकारांनी तयार केलेला आहे.

(हेही वाचा – ऑफिसमध्ये सरकारी कर्मचारी उशिरा येतात? Central Govtने घेतला महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या…)

‘आसामचा गमोसा’ (Yog Din 2024) हा आसामचा पारंपारिक पोशाख आहे, त्यामुळे त्याचे स्वतःचे महत्त्व विशेष आहे. तिथल्या संस्कृतीचं आणि परंपरेचं हे प्रतीक आहे. ‘गमोसा’ या शब्दाची उत्पत्ती ‘अंगोछा’ या शब्दापासून झाल्याचे अनेक लेखक सांगतात. आसामचे लोक हा स्पेशल गमछा पाहुण्यांना देतात.

ते कसे दिसते?
बहुतेकदा हा गमछा पांढऱ्या रंगात असतो. पांढऱ्या सुती कापडावर लाल किंवा हिरवा असे दोन रंग वापरून हे काम केले जाते. हा सहसा पांढरा आयताकृती कापडाचा तुकडा असतो. ज्याच्या तीन बाजूंनी बॉर्डर असते आणि चौथ्या बाजूला विणलेली डिझाइन असते. ते फक्त सुती कापडापासूनच बनते, पण विशेष प्रसंगी ते पारंपारिक आसामी सिल्कसारखे महागडे कापड आणि वेगवेगळ्या रंगात देखील बनवले जाते.

गमछाचे महत्त्व का वाढले?
आसाममधील या गमोसाला २०२२ मध्ये GI टॅग देण्यात आले आहे. गमोसाला जीआय टॅग मिळाल्यावर हजारो विणकरांनी आनंदोत्सव साजरा केला होता. आता पुन्हा मोदींना हा गमछा परिधान केल्यावर त्याचे महत्त्व विशेष वाढले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा गमछा बघून विविध प्रकारचे प्रश्न विचारले आणि प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.