Yoga Day 2024: “योग अर्थव्यवस्थेने” भारतात रोजगार निर्माण केला, १० वर्षांच्या विस्ताराविषयी मोदींनी सांगितले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित केला.

111
Yoga Day 2024:
Yoga Day 2024: "योग अर्थव्यवस्थेने" भारतात रोजगार निर्माण केला, १० वर्षांच्या विस्ताराविषयी मोदींनी सांगितले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये एका विशेष योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. शुक्रवारी, (२१ जून) १०वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त लोकांमध्ये योगाविषयी जागृती होत असून योगासने करण्याविषयी उत्साह वाढत आहे. या दिनाविषयी “योग अर्थव्यवस्थेने” (Yoga economy) भारतात रोजगार निर्माण केला आहे, असे मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, गेल्या १० वर्षांत योगाच्या विस्तारामुळे सर्व जुन्या धारणा बदलल्या असून प्राचीन भारतीय पद्धतीचे पालन करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित केला. पंतप्रधान म्हणाले की, “मी देशातील लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योगासने करणाऱ्या लोकांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय योग (International Yoga) दिनाने १० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला आहे. २०१४मध्ये मी संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला भारतासह १७७ देशांनी पाठिंबा दिला होता आणि तेव्हापासून योग दिवस नवीन रेकॉर्ड बनवत आहे.”

(हेही वाचा – Delhi Excise Scam: अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिनाला स्‍थगिती? )

फिटनेससाठी वैयक्तिक योग प्रशिक्षक
जगभरात योगाच्या विस्तारामुळे भारतातील योग पर्यटनाला चालना मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “गेल्या १० वर्षात, योगाच्या विस्तारामुळे योगाशी संबंधित धारणा बदलली आहे. आज जग एक नवीन योग अर्थव्यवस्था पुढे जाताना पाहत आहे. भारतात ऋषिकेश आणि काशीपासून केरळपर्यंत, योग पर्यटन विकसित झाले आहे. जगभरातून पर्यटक भारतात येत आहेत कारण त्यांना भारतात योग शिकायचा आहे. लोकं त्यांच्या फिटनेससाठी वैयक्तिक योग प्रशिक्षकही ठेवत आहेत. या सर्वांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.”

‘हा’ दैनंदिन जीवनाचा एक भाग
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाल्यापासून जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. “योगाविषयी लोकांचे आकर्षणही वाढत आहे. मी कुठेही जातो आणि ज्यांना (जागतिक नेते) भेटतो, ते मला कुतूहलाने योगाबद्दल विचारतात. योग हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत चालला आहे,” असेही ते म्हणाले.

प्राचीन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन…
पीएम मोदी पुढे म्हणाले की, योगामुळे शक्ती, चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढतो. पीएम मोदींनी जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी प्राचीन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

योगावर संशोधन होत आहे…
“यावर्षी भारतात फ्रान्समधील एका १०१ वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कधीच भारतात आल्या नव्हत्या; पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित केले. आज योगावर संशोधन केले जात आहे. जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठे आणि संस्थांचे शोधनिबंध प्रकाशित केले जात आहेत,” असेही पीएम मोदी म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.