महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे, कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सर्वांना सर्वश्रुत आहे, असे गौरवोद्गार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र आळंदीत परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त (Birthday Govinddev Giri Maharaj
) आयोजित ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. योगी आदित्यनाथ म्हणाले, मला आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली अक्षरे वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली आहे. अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाल्याने रामराज्य उभे राहिले आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : अयोध्येपाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल – देवेंद्र फडणवीस)
उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी मंदिरातील सर्व माहिती योगी आदित्यनाथ यांना दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community