महाकुंभादरम्यान (Mahakumbh) होणारे ‘शाही’ स्नान आता ‘अमृत’ स्नान नावाने ओळखले जाईल असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी जाहीर केले. प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाच्या तयारीचा दि. ३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
( हेही वाचा : Bangladesh मध्ये १०० हिंदु पोलीस अधिकार्यांना युनूस सरकारने काढून टाकले)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रयागराजच्या नैनी येथील बायो सीएनजी प्लांटचे अनावरण केले. तसेच फाफामाऊ येथील स्टील पुलाचे उद्घाटन केले. यानंतर महाकुंभ कामांची पाहणी केली. घाटांची अवस्था पाहिली आणि गंगाजलही प्यायले. स्थानिक बडे हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संतांना शाही स्नानाला नवीन नाव देण्याची प्रदीर्घ मागणीची आठवण करून दिली. तसेच महाकुंभातील शाही स्नान आता अमृत स्नान म्हणून ओळखले जाईल, असे जाहीर केले.
बैठकीत कुंभमेळा (Kumbh Mela) अधिकारी विजय किरण आनंद यांनी महाकुंभाच्या कामांची सविस्तर माहिती देताना सांगितले की, सुमारे 200 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये उड्डाणपुलाच्या कामांचाही समावेश आहे. जत्रा परिसरात 2 ते 3 किलोमीटरवर पार्किंगचे काम करण्यात आले असून 30 पोंटून पूल बांधले आहेत, 28 पूर्णपणे तयार आहेत. त्याचप्रमाणे 12 किलोमीटरचा तात्पुरता घाटही तयार आहे, 530 किलोमीटरच्या परिघात चेकर्ड प्लेट्स टाकण्यात आल्या आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या आहेत. याठिकाणी 7 हजारांहून अधिक संस्था दाखल झाल्या असून, शहरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.(Yogi Adityanath)
प्रयागराज (Prayagraj) येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असून महाकुंभमेळ्याला जगभरातून भक्तगण उपस्थित राहणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.भारतासह संपूर्ण जगात कुंभमेळा प्रसिद्ध आहे. महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. यंदा जानेवारी 2025 मध्ये कुंभमेळा आला आहे. त्यापूर्वी 2013 मध्ये कुंभमेळा पार पडला होता. प्रयागराज शहरात महाकुंभमेळा 2025 ची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तब्बल 12 वर्षांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार असून पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री या दिवशी साधू-संत आणि भाविकांचे अमृत स्नान होणार आहे. (Yogi Adityanath)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community