कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट न देता ‘या’ गाड्या चालवता येणार, काय सांगतो नियम?

124

नवीन वाहन घेण्याआधी प्रत्येक जण लायसन्स काढण्यासाठी धडपडत असतो. आता ऑनलाईन लायसन्स काढणे शक्य झाल्यामुळे ही प्रक्रिया थोडी सोपी झाली आहे. पण कोणतीही टेस्ट न देता सुद्धा तुम्हाला गाडी चालवता येते, हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. याबाबतचा नियम नेमका काय आहे तो जाणून घेऊया.

काय सांगतो नियम?

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी दररोज अनेक लोक अप्लाय करत असतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये अयशस्वी झाल्यामुळे अनेकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याला मुकावे लागते. मोटार वाहन कायद्याच्या बदललेल्या नियमानुसार, 16 ते 18 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला लर्निंग लायसन्स मिळवणे शक्य आहे. हे लर्निंग लायसन्स मिळाल्यावर कोणतीही Non Gear गाडी ते चालवू शकतात.

(हेही वाचाः टाटा आता बिसलेरीला देखील विकत घेणार, लवकरच होणार अधिकृत करार)

मात्र, गीअर असलेले वाहन चालवण्यासाठी पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. मात्र, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पक्के लायसन्स काढणे आवश्यक आहे. या लायसन्ससाठी केवळ ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

असे काढा लायसन्स

  • लर्निंग लायसन्स काढण्यासाठी https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do.या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे
  • त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर आरटीओ कडून त्याची पडताळणी करण्यात येईल
  • ही पडताळणी झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांच्या आत तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळू शकते
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.