नोंदणी केली नसेल तरीही आपण घेऊ शकता लस!

लाभार्थ्यांनी “कोविन” या संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी करुन याद्वारे घेण्यात आलेल्या लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजीकच्या लसीकरण केंद्रात थेट जाऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घ्यावी.

128

कोविन अॅपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजिकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी, तसेच नोंदणी केली नसेल तरीही रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

नियम पाळणे गरजेचे

कोविड- १९ संसर्गजन्य आजारांची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर, पात्र नागरिकांना लस घेता यावी, यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये नि:शुल्क तर सद्यस्थितीत एकूण ५९ खाजगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये या दराने सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. भारतात व मुंबईत कोविड-१९चा प्रार्दुभाव वाढत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना कार्यान्वित केलेल्या आहेत. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे विलगीकरण-अलगीकरण करण्यासह सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायजर)चा उपयोग करणे किंवा हात वारंवार धुणे, या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

(हेही वाचाः कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी परिणामकारक!)

लसीकरणासाठी हे करा

यासोबतच आता कोविड-१९ प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाली असून, आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी या लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. या संदर्भात शासनाने ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या आहेत. या अनुषंगाने नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील नमूद वयोगटातील लाभार्थ्यांनी “कोविन” या संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी करुन याद्वारे घेण्यात आलेल्या लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजीकच्या लसीकरण केंद्रात थेट जाऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घ्यावी.

(हेही वाचाः लस घ्यायची आहे? मग असे करा रजिस्ट्रेशन)

असे आहेत दर

तसेच, ज्या पात्र नागरिकांनी कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी केली नसेल, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन घ्यावी आणि त्यानंतर त्यांनी तेथेच लस घ्यावी. नोंदणी व लसीकरण या दोन्ही प्रक्रिया विचारात घेता, त्यासाठी थोडा अवधी लागू शकतो, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे लसीकरण महानगरपालिका अथवा शासनाच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नि:शुल्क तर, खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात सशुल्क २५० रुपये या दराने उपलब्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.