मुंबई महानगरमध्ये मेट्रोचे जाळे पसरले आहे, मात्र मेट्रोचे जाळे रेल्वे आणि बस या वाहतुकीला जोडणे अगत्याचे बनले आहे. त्यामुळेच MMRDA ने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांना ये-जा करणे सहज सोपे व्हावे यासाठी पादचारी पुलांची उभारणी केली जाणार आहे. या मेट्रो मार्गिकेवरील पंत नगर, विक्रोळी, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकांच्या परिसरात पादचारी पुलाची उभारणी करण्याची प्रक्रिया MMRDA ने सुरू केली आहे.
या पुलांमुळे या भागात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून उतरून बसथांबा, टॅक्सी स्टँड, रेल्वे स्थानकावर पोहोचणे शक्य होणार आहे. MMRDA कडून मेट्रो 4 मार्गिकेचा पहिला टप्पा या वर्षीअखेर सुरू केला जाणार आहे. तर संपूर्ण मार्ग पुढील दीड ते दोन वर्षात सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. मेट्रो 4 ही मार्गिका वडाळा येथून सुरू होऊन एलबीएस रस्त्यावरुन ठाण्याला जाते. या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यातून मेट्रो स्थानकातून प्रवासी रस्त्यावर उतरल्यास वाहतुकीलाही अडथळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर पादचारी पुलांमुळे प्रवाशांना थेट बस, टॅक्सी थांब्यावर अथवा रेल्वे स्थानकावर, तसेच इच्छितस्थळी विनाअडथळा पोहोचता यावे यासाठी या सुविधांची उभारणी करण्यास MMRDAकडून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमण्याची एमएमआरडीएने सुरू केली आहे.
या पादचारी पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कंत्राटदाराची नियुक्ती केल्यावर त्याला १५ महिन्यांत या पादचारी पुलांची उभारणी पूर्ण करावी लागेल. या पादचारी पुलावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा असेल, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची सोय केली जाणार आहे. दरम्यान, या पुलांच्या भागात विविध प्राधिकरणांच्या सेवा वाहिन्या आहेत. कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित असून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वीज वाहिनी, पाण्याची पाईप, ड्रेनेज, आदींचा समावेश आहे. पादचारी पुलाच्या उभारणीसाठी त्यांचे स्थलांतरण करावे लागणार आहे. MMRDA
Join Our WhatsApp Community