CNG कारचा मायलेज वाढवायचा आहे, ‘या’ टिप्स करा फॉलो!

98

वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात सीएनजी वाहनांना पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अधिक फायदेशीर इंधन मानले जाते. पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे देशात सीएनजी कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढतेय. कारण सीएनजी अधिक किफायतशीर आहे. तुम्हाला सीएनजी कारचा मायलेज वाढवायचा आहे, तर या टिप्स करा फॉलो…

एअर फिल्टर नियमित बदला

एअर फिल्टर तपासा नेहमी आणि नियमितपणे बदला, एअर फिल्टरमध्ये धूळ किंवा घाण अडकली असेल तर इंजिन जास्त प्रमाणात इंधन वापरते. ज्यामुळे कार्यक्षमता होते.

सीएनजी टँकमध्ये ओव्हरफिलिंग

सीएनजी टाकी पूर्णपणे भरणे टाळा. जास्त भरलेल्या टाकीमुळे आऊटगॅसिंग होऊ शकते. ज्यामुळे मौल्यवान इंधनाचा अपव्यय होतो. पेट्रोल-डिझेल कारमध्ये ओव्हरफिल टाळण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे सीएनजी टँकमध्येही गॅस पूर्ण भरू नये.

टायर प्रेशर मेंटेन ठेवा

इंधनाचा प्रकार विचारात न घेता, इंधन कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी टायर प्रेशर मेंटेन ठेवणे महत्त्वाचे असते, टायरमध्ये कमी हवा म्हणजे इंजिनवर जास्त प्रेशर, ज्यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो.

एसी आणि एअर हीटर वापरणे टाळा

पेट्रोल-डिझेल कारप्रमाणेच सीएमजी कारमध्येही एसी किंवा हीटरचा अतिवापर टाळा, दोन्ही खूप ऊर्जा वापरतात. परिणामी इंधनाचाही जास्त वापर होतो, नंतर एकूण इंधन बिलावर परिणाम होतो.

सीएनजी गॅस लिड नेहमी घट्ट बंद ठेवा

गॅस लीडमध्ये काही मार्ग किंवा गळती असल्यास इंधन टाकीमधून सीएनजी वायू बाष्पीभवन होऊ शकतो. गॅस लीड घट्ट बंद आहे याची खात्री करा, तसेच सावलीत गाडी पार्किंग करा. त्यामुळे बाष्पीभवनची शक्यता कमी होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.