Confrim तिकीट नाहीये? आता ट्रेनमध्ये प्रवास करताना मिळेल हक्काची जागा

रेल्वेतील कागदाचा वापर कमी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. करंट चार्ट तयार झाल्यानंतर सुद्धा प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणार आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान अनेक सीट रिकाम्या राहतात या जागा कोणाला द्यायच्या याबाबत टीसीची मक्तेदारी चालायची. या मक्तेदारीला आळा बसविण्यासाठी रेल्वेने आता ‘हॅण्ड हेल्ड टर्मिनल’ ही प्रणाली अस्तिवात आणली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे सुटल्यानंतर सुद्धा Confirm तिकीट मिळण्यास मदत होईल. यासाठी रेल्वे प्रशासन प्रत्येक विभागाला एचएचटी मशीन देणार आहे.

ही सुविधा सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, हसन एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस पुणे-नागपूर गरीब रथ, मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये सुरू झाली आहे. लवकरच मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, एर्नाकुलम या ट्रेन्समध्ये सुद्धा ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

सीट वाटपात पारदर्शकता

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. या मशिन रेल्वे सर्व्हरशी जोडल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एक 4G सिम कार्ड असणार आहे. याद्वारे तिकीट, सीट संदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे.

एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिनची वैशिष्ट्ये

  • रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, पर्यवेक्षकांना माहिती मिळेल.
  • रेल्वे सर्व्हरशी मशिन कनेक्ट असेल.
  • प्रतीक्षा करणाऱ्यांना निश्चित सीट मिळेल.
  • सीट वाटपात पारदर्शकता निर्माण होईल.
  • रेल्वेतील पाणी, वीज, अस्वच्छता, बेडरोल, स्वच्छतागृह, आजारी रुग्ण यासंबंधित माहिती नोंदवली जाणार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here