सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे, असे आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. (Raju Shetty)
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित ७ व्या युवा संसदेचे उद्घाटन हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत, हे उद्दिष्ट निश्चित करावे. राजकारण म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारण जर सकारात्मकतेने केले तर जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहते ही मी वैयक्तिक अनुभवातून आपल्याला सांगतो. राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीच पुढे नेऊ शकते. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. (Raju Shetty)
(हेही वाचा : Maratha Reservation : कोणीही नाराज होणार नाही असा आहे राज्य सरकारचा निर्णय – चंद्रशेखर बावनकुळे)
तर याच कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, राजकारणामध्ये निष्ठा कायम ठेवली तर यश निश्चितच मिळते. राजकीय सूडापोटी माझ्या वडिलांचा खून झाल्यानंतर मी लोकांच्या प्रेमापोटी राजकारणामध्ये आलो आणि आज तळागाळातील लोकांपर्यंत माझे काम पोचल्यामुळे त्यांना मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो, हे माझ्या राजकारणाचे यश आहे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी म्हणून काम करू नका. समाजाविषयी तळमळ तुमचा कामातून दिसली तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात.
हेही पहा –