Pune : पुण्याच्या तरुणाने ब्रिटनमध्ये राखली भारताची शान, वाचा…नेमकं काय घडलं?

162
Pune : पुण्याच्या तरुणाने ब्रिटनमध्ये राखली भारताची शान, वाचा...नेमकं काय घडलं?
Pune : पुण्याच्या तरुणाने ब्रिटनमध्ये राखली भारताची शान, वाचा...नेमकं काय घडलं?

पुण्याच्या (Pune) एका तरुणाने ब्रिटनमध्ये तिरंग्याचा मान जपला आहे. तिरंग्याचा अवमान पाहताच या तरुणाने तिरंगा ध्वजाला उचलून स्वत:च्या जवळ घेतला. तिरंग्याची शान राखली. सोशल मिडियावर त्याचा हा व्हिडियो व्हायरल झाला असून या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तरुणाचे कौतुक केले आहे.

सत्यम सुराणा असे नाव असलेला हा तरुण विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतो. ब्रिटनमध्ये ( Britain)  खलिस्तानी समर्थकांकडून होत असलेल्या प्रदर्शनावेळी भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला होता. यावेळी या तरुणाने तिरंगा झेंड्याचा मान राखला. जमिनीवर पडलेला झेंडा तो पोलिसांसमोर आपल्या हाताने उचलून घेतला.

(हेही वाचा – Israel-Palestine War : कोण आहे नवा ओसामा बिन लादेन; इस्रायलची संशयाची सुई ‘या’ आतंकवाद्याकडे )

सत्यमने शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये, भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केल्याचं दिसून येत आहे. त्याचवेळी एका पोलीस अधिकाऱ्याचा पायही तिरंगा ध्वजावर पडल्याचे दिसत आहे. या विरोध प्रदर्शनास्थळी जाऊन सत्यम सुराणाने जमिनीवर पाडलेला तिरंगा ध्वज उचलून घेत भारताची शान राखली. सत्यमचा हा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सत्यम पुण्यातला रहिवासी असून ज्या मतदारसंघात राहतो तेथील आमदार सुनील कांबळे यांनीही सत्यमच्या धाडसाचं कौतुक केलंय तसेच सत्यमसह त्याच्या आई-वडिलांशीही फोनवरून संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे पुण्यातील सर्व नागरिक आणि माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 It feels like there has been a noticeable and worrying increase in discriminatory anti-Hindu language and the use of vile tropes about Hindus coming from a small but vocal minority of these Pro Khalistan Extremists (PKEs). If the hateful language these thugs use against Hindus… pic.twitter.com/Qx9R7HTpFs

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.