तब्बल सात दिवसांनी बेपत्ता तरुणाचा मृतदेह टाकीत सापडला!

प्रेम प्रकरणाचा गावभर बोभाटा झाल्यामुळे सुरेंद्र मंडल याची बदनामी झाली होती. या बदनामीतून सुरेंद्रने राजेश चौपाल याला अद्दल घडवण्यासाठी बिहार येथून गोड बोलावून मुंबईत आणले.

76

कुर्ला टर्मिनल येथून गुढरित्या बेपत्ता झालेल्या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार मुंबई गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पथकाने बिहार आणि कर्नाटक येथून मारेकऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांपैकी एकाच्या पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधावरून या तरुणाचे अपहरण करून त्याला मुंबईत आणून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत ताब्यात घेतला!

राजेश चौपाल उर्फ मंडल (२३) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी राजेशचा मृतदेह सीएसटीएम येथील डी.एन रोड येथील हॉर्नबी इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून कुजलेल्या अवस्थेत ताब्यात घेतला आहे. सुरेंद्र मंडल (३०), शम्भो सदाय (३०), रामकुमार सदाय (२३) आणि विजय तीरसे (५२) असे अटक कऱण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. राजेश चौपाल हा हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी १६ मे रोजी ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. बिहार येथून मुंबईत घरी येण्यासाठी निघालेला राजेश चौपाल हा कुर्ला टर्मिनसपर्यंत व्यवस्थित आला, पण तेथून गुढरित्या बेपत्ता झाल्यामुळे हे प्रकरण गंभीर असावे, या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. कक्ष ५ चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सदानंद येरेकर, मोहिनी लोखंडे, सपोनि. महेंद्र पाटील, गणेश जाधव, माळी आणि पथकाने तपास सुरु करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला.

(हेही वाचा : अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त!)

बदनामीमुळे सुरेंद्रने राजेश चौपाल याला अद्दल घडवली!

बेपत्ता झालेला राजेश चौपाल हा गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये बिहार येथे गावी गेला होता, त्या ठिकाणी त्याचे आरोपी सुरेंद्र मंडल यांच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरु झाले. या प्रेम प्रकरणाचा गावभर बोभाटा झाल्यामुळे सुरेंद्र मंडल याची बदनामी झाली होती. या बदनामीतून सुरेंद्रने राजेश चौपाल याला अद्दल घडवण्यासाठी बिहार येथून गोड बोलावून मुंबईत आणले. १४ मे रोजी मुंबईत आलेल्या राजेशला या चौघांनी फोर्ट येथील अकबर अली ट्रॅव्हल्स येथील एका बांधकाम साईडवरील इमारतीत आणून चौघांनी त्याची हत्या केली आणि मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या रिकाम्या टाकीत टाकून वरून २५ किलो मीठ टाकीत टाकून विजय तीरसे याने कर्नाटक तर इतर तिघांनी बिहार येथे पळ काढला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या चौघांना बिहार आणि कर्नाटक येथून अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.