मोटार चालकांच्या निष्काळजीमुळे गेले तरुणाचे प्राण!

पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता मोटार चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात होऊन अमन याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी मोटारचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

चालकाने अचानक मोटारीचा दरवाजा उघडल्यामुळे पाठी मागून भरधाव वेगाने येणारा दुचाकी मोटार चालक दरवाजावर धडकला. त्याच वेळी दुचाकीस्वार बाजूने जाणाऱ्या बेस्ट बसच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा दुर्देवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी बोरिवली पूर्व  येथे घडली. या अपघातानंतर पळून गेलेल्या मोटार चालकाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकाचा मुलगा होता अमन!

अमन यादव (१९) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमन यादव हा आपल्या कुटुंबियांसह दहिसर येथे राहण्यास होता. कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारा अमनचे वडील रिक्षाचालक असून वडिलांना हातभार लागावा म्हणून अमन छोटेमोठे काम करीत होता. शुक्रवारी दुपारी अमन घरातून काहीही न सांगता बाहेर पडला होता. अमन हा मित्राची ऍक्टिव्हा घेऊन बोरिवली पूर्व एसव्ही रोड वरून भरधाव वेगात जात असताना पुढे उभ्या असलेल्या एका मोटारीच्या चालकाने अचानक पुढचे दार उघडले आणि अमन हा ऍक्टिव्हासह मोटारीच्या दारावर जोरात धडकून बाजूने जाणाऱ्या बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली आला.

मोटारचालका विरुद्ध गुन्हा दाखल

नागरिकांनी धाव घेऊन जखमी अमनला नजीकच्या रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघातानंतर मोटारचालक हा अपघातस्थळावरून फरार झाला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता मोटार चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात होऊन अमन याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी मोटारचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here