Veer Savarkar : युवकांना सावरकर समजले नाहीत, हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव – रणजित सावरकर

'परंपरा या माझ्या जीवनाकरिता उपयुक्त आहेत, म्हणून मी त्या स्वीकारतो', असे ते नेहमी सांगायचे. कारण ते उपयुक्ततावादी, व्यवहारवादी होते. 'भक्ती करू नका, अनुकरण करा; अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका', असे सावरकर म्हणायचे. त्यामुळे युवकांनी सावरकर वाचायला हवेत, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.

152
Veer Savarkar : युवकांना सावरकर समजले नाहीत, हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव - रणजित सावरकर
Veer Savarkar : युवकांना सावरकर समजले नाहीत, हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव - रणजित सावरकर

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य, इतिहास आजच्या युवा पिढीला माहिती नाही. (Veer Savarkar) हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव आहे, असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सेवांकुर भारत, कोकण प्रांत’ यांच्या वतीने आयोजित ‘बौद्धिक सत्रात’ ते बोलत होते. लोअर परळ येथील यशवंत भवन सभागृहात शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला हिंदुजा रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती रोजेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, डॉ. ज्ञानेश गवांकर यांच्यासह मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि सेवांकुर भारत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आसाममधील विविध प्रांतांतून विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Devendra Fadanvis : ‘मी पुन्हा येईन’ची चर्चा पुन्हा का झाली ?)

रणजित सावरकर म्हणाले, ”स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर आक्रमण करण्याची एकही संधी सोडण्यात आली नाही. सावरकर आणि त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास दाबण्यात आला. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, वसाहतवाद, पाश्चिमात्य राष्ट्रे, चीनचा इतिहास, हिटलर, मुसोलिनीचा इतिहास आपल्याला शालेय पुस्तकांतून शिकवला जातो. पण, आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्यांना अवमानकारक वागणूक दिली जाते. हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव आहे. त्यामुळे युवकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून क्रांतिकारकांचा खरा इतिहास वाचावा.” (Veer Savarkar)

अनुकरण करा, पण अंधानुकरण नको

‘आजच्या पिढीला भावेल, असा एकमेव नेता आहे, तो म्हणजे सावरकर’, असे अभिनेता रणदीप हुड्डा अभिमानाने सांगतो. ते खरे आहे. कारण सावरकर हे आधुनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते. ते निरीश्वरवादी होते. हे त्यांचे हे अंग कोणीही सांगत नाही. ज्या परंपरा उपयुक्त आहेत त्या अंगिकारल्या, ज्या उपयुक्त नाहीत, समाजासाठी हानिकारक आहेत, त्यांचा त्याग केला. कारण ते उपयुक्ततावादी, व्यवहारवादी होते. ‘भक्ती करू नका, अनुकरण करा; अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका’, असे सावरकर म्हणायचे. त्यामुळे युवकांनी सावरकर वाचायला हवेत, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.

आपला इतिहास पराभवाचा नाही !
  • सिंधू (नदी)पासून सिंधू (समुद्र)पर्यंत पसरलेल्या भारतभूमीला जो आपली पितृ-भूमी आणि पुण्य-भूमी मानेल, तो “हिंदू” आहे, अशी व्याख्या सावरकरांनी केली.
  • आपला इतिहास हा पराभवाचा नाही. एकसंघ नसल्यामुळे आपली हार झाली. त्यामुळे एकतेत ताकद आहे, हे सावरकरांनी नेहमी सांगितले. त्यांचा हा उपदेश अनंत काळासाठी उपयुक्त आहे.
  • अस्पृश्यता निवारणासाठी सावरकरांनी मोठे कार्य केले. आरक्षण प्रश्नावर डॉ. आंबेडकर आणि बॅरिस्टर सावरकर यांच्यात विचारसाम्य होते. आरक्षण हे १० वर्षांसाठी असावे, हे दोघांचेही मत होते, असेही रणजित सावरकर म्हणाले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.