Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन

42
Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन
Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन

मंत्रालयातल्या (Mantralaya) सुरक्षा जाळीवर एका तरुणाने उडी मारुन आंदोलन (Protest) केलेल्याची घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी घडली. आंदोलकाने (Protest) सुरक्षा जाळीवर (Safety net) उडी मारल्यानंतर पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत त्याला ताब्यात घेतले. साधारण अर्धा तास सुरु असलेल्या या प्रकारामुळे मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केली होती. सुदैवानं मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत हा तरुण अडकल्याने मोठा अनर्थ टळला. पुण्यातील विजय परबती साष्टे असे तरुणाचे नाव आहे.

(हेही वाचा : मच्छिमार संस्थांसाठी समन्यायी तलाव वाटपाचे धोरण; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची माहिती)

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आंदोलक (Protest) तरुण महसूल खात्यासंदर्भात (Revenue Department) तक्रारीच्या निवारणासाठी मंत्रालयात (Mantralaya) आला होता. परंतु, त्याचे काम होत नसल्यामुळे तरुण पुरता वैतागला होता. त्यामुळे त्याने घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या (Mantralaya) चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यावेळी युवकाच्या हातात महसूल विभागात (Revenue Department) सात-बारा नावावर होत नाही, अशी पत्रके होती. ती पत्रके उडवत तरुणाने (Youths protest) संरक्षण जाळ्यांवर उडी मारली. (Mantralaya)

युवकाने जाळीवर उडी घेतल्यानंतर पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर (Safety net) उड्या मारत जाळीवरच्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. साधारणरणे २० ते ३० मिनीटे हा गोंधळ सुरू होता. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेनंतर मोठा पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

विजय साष्टे यांची पार्श्वभूमी

विजय परबती साष्टे हे पुण्यातील रामनगर, वारजे माळवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे महसूल विभागाशी संबंधित काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यामुळे हताश होऊन त्यांनी हे आंदोलन छेडले.

सरकारी कार्यालयांमधील विलंबित कामांमुळे संताप

सरकारी विभागांमध्ये कामे रखडल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विजय साष्टे यांचा हा संताप त्याचेच प्रतीक मानला जात आहे. मंत्रालयात अशा प्रकारच्या आंदोलनांचे प्रमाण वाढत असून, यापूर्वीही अनेक वेळा लोकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी संरक्षक जाळीवर उड्या मारण्याचे प्रकार घडले आहेत.

सरकारची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक होणार?

या घटनेनंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अधिक काटेकोर तपासणी केली जाईल, अशी चर्चा सुरक्षावर्तुळात सुरू झाली आहे. सरकारी कार्यालयांमधील विलंब टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी अधिक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने यावर योग्य तो उपाय शोधावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.