महाकुंभपर्वात Hindu Janajagruti Samiti चे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

99
महाकुंभपर्वात Hindu Janajagruti Samiti चे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने (Hindu Janajagruti Samiti) आरंभलेले कार्य, यांविषयी महाकुंभपर्वातील समितीचे ग्रंथ आणि फलक प्रदर्शन युवकांना भावले. शास्त्रीय भाषेत धर्माचे स्वरूप, प्राचीन भारतीय संस्कृती आणि हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घेण्यासाठी युवक-युवती उत्सूक असल्याचे यावरून दिसून आले. कुंभक्षेत्री सेक्टर ६ मधील कैलासपुरी-भारद्वाज मार्ग चौकात असलेल्या या प्रदर्शनाला आतापर्यंत सहस्रो युवक-युवतींनी भेट देऊन हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजून घेतले आहे. यांतील अनेकांनी समितीच्या धर्मकार्यात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धताही दर्शवली.

(हेही वाचा – India-US Trade : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत ५०० दशलक्ष अब्जांवर नेण्याचा संकल्प)

महाकुंभमेळ्यामध्ये विविध राज्यांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या युवकांनी कुंभपर्वात आल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या (Hindu Janajagruti Samiti) या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. सामाजिक माध्यमांद्वारे प्रदर्शनातील फलकांचा प्रचार करण्यासाठी सर्वच युवकांनी स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये प्रदर्शनातील फलकांची छायाचित्र काढली. प्रदर्शन पाहून झाल्यावर ‘सेल्फी पॉईंट’वर ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणा देऊन भाविकांनी स्वत:ची छायाचित्रेही काढली. प्रदर्शनाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेमध्ये भारत हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

(हेही वाचा – Live In Relationship मधून जन्माला आलेल्या बाळाची १० हजारात विक्री)

‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या ग्रंथाला सर्वाधिक मागणी !

प्रदर्शनामधील ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडन’ आदी ग्रंथांना भाविकांची सर्वाधिक मागणी होती. प्रदर्शनामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर, तसेच काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांची वस्तूस्थिती मांडण्यात आली आहे. हिंदु संतांच्या हत्या, तसेच लव्ह जिहादची भीषणता यांचे वास्तव पाहून हिंदूंमध्ये जागृती निर्माण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हे प्रभावी प्रदर्शन आपापल्या जिल्ह्यात लावण्याची सिद्धता धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे दर्शवली. आपापल्या भागात स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणे, धर्मशिक्षणवर्गाच्या आयोजनासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारे हिंदु जनजागृती समितीच्या (Hindu Janajagruti Samiti) कार्यात सहभागी होण्याची सिद्धताही अनेकांनी दर्शवली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.