Love Jihad : आता कर्नाटकातील युनूस पाशाची विकृती, हिंदू अल्पवयीन मुलीवर ‘असे’ केले अत्याचार

दिवसेंदिवस लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस येत असताना काही प्रकरणे अशीही आहेत ज्यामध्ये मुसलमान तरुण जबरदस्तीने हिंदू मुलींचा छळ करत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकात घडला आहे. या ठिकाणी युनूस पाशा या आरोपी मुसलमान तरुणावर कर्नाटकातील बेंगळुरू येथे अल्पवयीन हिंदू मुलीचे लैंगिक शोषण आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाशाने पीडितेला व्हिडीओ कॉलवर तिच्या शरीरातील गुप्तांग दाखवण्यासही भाग पाडल्याचे सांगितले जात आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून युनूसविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्मार्ट फोन दिला आणि गुप्तांग दाखवायला सांगितले 

हे प्रकरण नागमंगला टाउन येथील आहे. पोलिसांत तक्रार देताना पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, १२ नोव्हेंबर रोजी त्यांची मुलगी अस्वस्थ होती. याचे कारण विचारल्यावर तिने युनूस पाशा फयाज अहमद नावाच्या मुलाशी झालेल्या संभाषणाची माहिती दिली. पीडितेने सांगितले की, फयाजने तिला स्मार्टफोन आणि सिम पाठवले आणि व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. यादरम्यान त्याने पीडितेला तिचे गुप्तांग दाखवण्याचा आग्रह धरला, जो पीडितेने मान्य केला. पीडितेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, युनूस पाशाने त्यांच्या मुलीचे व्हिडिओ कॉल्सही रेकॉर्ड केले होते. त्यानंतर त्याने पीडितेला तिच्या आक्षेपार्ह छायाचित्रांच्या मदतीने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

(हेही वाचा कुमारस्वामींचा सत्ता जिहाद! म्हणाले, पुन्हा सत्ता दिल्यास…)

आरोपीचा शोध सुरू

१० नोव्हेंबर २०२२ रोजी पीडिता तिच्या आजीच्या घरी गेली असता आरोपीने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या ज्या आरोपीने घरातील जेवणात मिसळण्यास सांगितल्या. त्यानंतर युनूसने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. हा लैंगिक अत्याचार पीडितेच्याच घरात झाला. नंतर त्याने पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारून लग्न करण्यास भाग पाडले. फिर्यादीनुसार, यावेळी आरोपीने त्यांच्या मुलीला या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. आपली मुलगी अत्यंत घाबरलेली असल्याचे सांगून पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी युनूस पाशाविरुद्ध ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणि POCSO च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here