‘तो’ तुरुंगातून चालवायचा गॅंग, खंडणीही उकळायचा!

मंगळवारी बचकाना याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

118

तुरुंगातून घाटकोपर येथील बांधकाम व्यावसायिकाला फोन वरून खंडणीसाठी धमकी देणारा गँगस्टर युसुफ बचकाना याला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने कर्नाटकच्या तुरुंगातून अटक केली. युसुफ सुलेमान कादरी उर्फ युसुफ बचकाना याच्या अटकेमुळे मुंबईतील अनेक गंभीर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

युसुफ बचकाना जन्मठेपेची शिक्षा भोगतोय!

युसुफ सुलेमान कादरी उर्फ बचकाना हा कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. दाऊद, छोटा शकील त्यानंतर छोटा राजन, रवी पुजारी यांच्या टोळीत काम करणारा गँगस्टर युसुफ बचकाना याने स्वत:ची टोळी तयार केली आहे. कर्नाटकच्या तुरुंगात बसून आपल्या टोळीवर नियंत्रण ठेवणारा युसुफ बचकाना याने गेल्या महिन्यात घाटकोपर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय व्हाट्सअप्प क्रमांकावरून कॉल करून ५० लाख रुपयाच्या खंडणीसाठी धमकावत होता. खंडणी दिली नाही, तर माझे मुले येऊन घरात फटाके वाजवून जातील, या आशयाची धमकी बचकाना याने दिली होती.

(हेही वाचा : ठाण्याच्या बारमधील वसुली किती आणि कुणासाठी ?)

खंडणी कॉलचा शोध घेतला, आणि…

घाबरलेल्या व्यावसायिकाने या प्रकरणी मुंबई खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता सदरचा कॉल हा कर्नाटक येथील बेल्लारी तुरुंगातून आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कर्नाटक येथे रवाना होऊन अधिक माहिती मिळवली असता युसुफ बचकाना हा बेल्लारी तुरुंगात असून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, त्यानेच तुरुंगातून धमकीचे कॉल केल्याचे समोर आले.

बचकानाला २७ जुलैपर्यंत कोठडी!

खंडणी विरोधी पथकाने कर्नाटक पोलिसांना सदरची माहिती देऊन युसुफ बचकाना याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोमवारी युसुफ बचकाना याला अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. मंगळवारी बचकाना याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा : राज कुंद्रा ‘असा’ फसवायचा तरुणींना? गुन्हे शाखेने सांगितली मोडस ऑपरेंडी!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.