युवा सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला ५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची भेट!

83

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविडच्या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असून हा जिल्हा कोविड आजाराच्या रुग्णामध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे युवा सेना आणि मुंबई म्युनिसिपल को-ऑप बँकेचे संचालक व युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांना पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची भेट दिली आहे.

(हेही वाचा : महापालिका प्रभागांची पुनर्रचना होणार, विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर आयोगाचे पत्र)

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना नगरसेविका व मुंबईच्या माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि युवासेना सिनेट सदस्य व मुंबई म्युनिसिपल को. ऑप. बँकेचे संचालक प्रदीप सावंत यांच्या विशेष सहकार्याने हेक्झावेर टेक्नॉलॉजी यांचे ५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते सिंधुदुर्ग निवासी उपजिल्हाधिकारी शंभांगी साठे आणि अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे रुग्णांच्या उपचाराकरता सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी मालवण, कुडाळ विधानसभेतील शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात चार दिवसांपूर्वी पार पडला. याप्रसंगी युवासेना सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, महादेव जगताप, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जि. प. सदस्य संजय अग्रे, शाखाप्रमुख गोपाळ खाडे, विकास कुडाळकर, युवासेना तालुका समन्वयक गुरुनाथ पेडणेकर, युवासेना शहर अधिकारी तेजस राणे, उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.